वेबसाइट वरील विभाग या मेनू मध्ये माहिती टाकण्यासाठी खालील मुद्दे नुसार माहिती मिळावी. (माहिती ओपन फाइल मध्ये सादरकरावी)
1. विभागाची स्थापना :
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेंतर्गत दि. १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार समता विभागाची स्थापना करण्यात आली.
2. विभागाची संरचना / पदसंरचना
अ.क्र. |
पदाचे नाव |
मंजूर पदे |
कार्यरत पदे |
कार्यरत पदावरील व्यक्तीचे नाव |
१) |
प्राचार्य |
०१ |
०१ |
|
२) |
वरिष्ठ अधिव्याख्याता |
०२ |
०१ |
|
३) |
अधिव्याख्याता |
०५ |
०१ |
|
४) |
विषय सहायक |
०५ |
०० |
|
५) |
लिपिक / डाटा एन्ट्री ऑपरेटर |
०२ |
०० |
|
६) |
कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएसआर च्या मदतीने |
०२ |
०० |
|
७) |
शिपाई |
०२ |
०१ |
|
3. महत्त्वाचे शासन निर्णय
- १७ ऑक्टोबर २०२६
4. विभागाची उद्दिष्टे
- १००% मुले शिकण्यासाठी शिक्षण विभागातील व्यक्तींची समतामूलक दृष्टी विकसित करणे.
- स्त्री-पुरुष जन्मदरातील प्रमाणाच्या संतुलनाबाबत जाणीव जागृती करणे.
- सर्व शरीर प्रकारांमध्ये (स्त्री, पुरुष, दिव्यांग, अन्यलिंगी) वागणुकीत समानता आणणे.
- शिक्षण प्रक्रियेत समतेचे स्थान बळकट होण्यासाठी अभ्यासक्रम, मूल्यमापन, विविध प्रशिक्षण, कार्यशाळांमधून समतामूलक विचारांची आवश्यकता स्पष्ट करणे.
- शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहामध्ये आणणे व टिकून ठेवणे यासाठी प्रयत्न करणे.
- शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्यांचे सक्षमीकरण करणे.
- विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणे व टिकवून ठेवणे.
- बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत प्रचार व प्रसार करणे.
- मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागृती करणे.
५. विभागांतर्गत असलेले उपविभाग :
- लैंगिक परस्परावलंबन
- धार्मिक परस्परावलंबन
- जातीय परस्परावलंबन
- शाळाबाह्य मुले व गळती
- शाळा व्यवस्थापन समिती
- विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण
6. विभागातील कामे / उपक्रम :
I. Special Training for Out of school children :
- शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहामध्ये आणणे व टिकून ठेवण्याच्या अनुषंगाने वयानुरूप प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी भाषा व गणित (मराठी व उर्दू माध्यम) पुस्तके निर्मिती व वितरण.
- शिक्षकांसाठी शिक्षक मार्गदर्शिका निर्मिती व वितरण.
- शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन.
II. शाळा व्यवस्थापन समिती (SMC) आणि शाळा व्यवस्थापन विकास समिती (SMDC) सदस्य सक्षमीकरण :
- SMC आणि SMDC सक्षमीकरण मार्गदर्शिका निर्मिती व वितरण.
- SMC आणि SMDC सक्षमीकरण साहित्य निर्मिती व वितरण.
- SMC आणि SMDC सक्षमीकरण अनुषंगाने शिक्षकांचे प्रशिक्षण.
III. विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी उपक्रम :
- विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी साहित्य निर्मिती व वितरण.
- विशेष शिक्षकांचे प्रशिक्षण.
IV. बालकांचे हक्क व सुरक्षा :
- बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव जागृती साठी मार्गदर्शिका निर्मिती.
- शिक्षकांचे प्रशिक्षण
V. मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागृती :
- मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण.
- इयत्ता ६ वी ते १२ वी च्या निवडक शाळांमधील विद्यार्थीनीना सॅनिटरी पॅड नॅपकीन व साहित्य वितरण .
क्षणचित्रे :