महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०
विभागाचे नाव - आय.टी. विभाग
विभागाची पार्श्वभूमी: शासन निर्णय दि. १७ ऑक्टोबर २०१६ नुसार राज्य शैक्षाणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यातील विभागांची पुनर्रचना करण्यात आली व त्यानुसार “आय.टी व प्रसारमाध्यम” विभाग
अंतर्गत आय.टी विभाग सुरु करण्यात आला.
विभागाची उद्दिष्टे:
- परिषदेने निश्चित केलेल्या शिक्षणाच्या गुणवत्तेच्या Bench mark प्राप्तीसाठी माहिती संप्रेषण व
तंत्रज्ञानाचा (ICT) अधिकाधिक वापर करणे.
- अध्ययन व विकासाच्या संधीसाठी ई साहित्य तयार करणे.
आय.टी. विभागामार्फत करण्यात येत असलेली कामे:
- राज्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षणांचे नियोजन व आयोजन करणे.
- अध्यापन व अध्ययन पूरक ई साहित्य निर्मिती करणे.
- विविध खासगी संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यांचे मार्फंत राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच
त्यांच्याद्वारे निर्मित ई साहित्य, विविध प्रस्ताव याबाबत अभिप्राय सादर करणे.
- आभासी वर्ग virtual class नियोजन व आयोजन.
- ई साहित्य दीक्षा अॅप वर उपलब्ध करून देणे.
- परिषदेतील विविध online मिटिंग ,झूम मिटिंग ,वेबीनार ,u tube live कमी तांत्रिक सहकार्य करणे.
- PM e vidya ह्याशैक्षणिक वाहिनी वरू न रेकॉर्डेड video प्रक्षेपित केली जातात.
पदाचे नाव |
मंजूर पदे |
कार्यरत पदे |
रिक्तपदे |
उपसंचालक (आय.टी व प्रसारमाध्यम) |
1 |
1 |
0 |
वरिष्ठ अधिव्याख्याता |
1 |
1 |
0 |
अधिव्याख्याता |
1 |
1 |
0 |
अधिक्षक गट ब |
1 |
1 |
0 |
लिपिक /डाटा एन्ट्री ऑप. |
2 |
0 |
2 |
विषय सहायक |
2 |
0 |
2 |
कंत्राटी नियुक्तीने(CSR) |
1 |
0 |
1 |
शिपाई |
2 |
1 |
1 |
वर्ग १ ते ३ एकूण |
8 |
3 |
5 |
उपसंचालक यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या:
- आय.टी. विभागाच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे.
- विद्यार्थी मदतीसाठी ई साहित्य निर्मिती योजना तयार करणे.
- शिक्षक सक्षमीकरणासाठी कार्ययोजना तयार करणे.
- संपादणूकीचा आढावा घेणे.
प्रशासकीय कर्तव्ये:आय. टी. विभागांतर्गत खालील कामी केली जातात.
- विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे.
- रजा मान्यता व रजा प्रकारानुसार शिफारस करणे.
- गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करणे.
- विभागातील कर्मचाऱ्यांचा समन्वय व त्यांच्या अडचणी सोडवणे.
- मा. संचालक प्रस्तुत परिषद यांचेकडील सभेस उपस्थित राहून विभागाचा आढावा सादर करणे
- माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अपिलीय अधिकारी म्हणून सुनावणी घेणे
- न्यायालयीन प्रकरणे तसेच विधानमंडळ /विधानपरिषद संबंधित तारांकित / अतारांकित प्रश्न, ठराव, सूचना ,लक्षवेधी इ.कामकाज.
आर्थिक कर्तव्ये :-
- विभागाच्या कार्ययोजना व आराखडा तयार करणे व मान्यतेसाठी सादर करणे.
- मान्य तरतूदीनुसार कार्ययोजना व अंमलबजावणी राज्यात करणे.
- मान्य आराखड्यानुसार अंमलबजावणी टप्यानुसार तरतूद खर्च करण्या विषयक कार्यवाहीची शिफारस लेखा व समग्र शिक्षा अभियानास करणे.
- मान्य तरतूद व खर्च तरतूद यांचा ताळमेळ साधणे.
सांघिक कर्तव्ये :-
- विभागाची उहिष्टे निश्चित करुन त्यानुसार विभाग गतिमान करणे.
- समन्वयाने विभागाची विकसनशील ध्येय-उददीष्टे साध्य करणे.
- KRA नुसार धोरण राबवणे.
- शिक्षक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध राहणे.
- शासनाच्या योजना, आदेशाचा अभ्यास करुन विभागाची वाटचालकरणे.
- SCERT मधील सर्व विभागाशी समन्वय साधुन गुणवत्तेच्या दिशेने वाटचाल करणे.
वरिष्ठ अधिव्याख्याता : उपविभागप्रमुख
- आय.टी विषयाचे वार्षिक अंदाज पत्रक तयार करणे.
- राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे आय.टी. विषयाचे अध्ययन परिणामकारक व्हावे. या उद्देश्याने विविध योजना व कृती कार्यक्रमांची आखणी करणे. कार्यक्रमाची दिशा ठरविणे, प्रशिक्षण साहित्य वि कसन करणे, प्रशिक्षणे ठरविणे यासाठी अभ्यास गट निश्चित करणे, त्यातील व्यक्तींची निवड अंतिम करणे.
- राज्यातील आय.टी विषय अध्ययन अध्यापन विषयक सद्यस्थितीचा आढावा घेऊन प्रशिक्षण विषयक गरजांची निश्चिती करणे व गरजाभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची योजना करणे व त्यांची अंमलबजावणी करणे तयार
- विद्यार्थ्यांचे आय.टी चे अध्ययन सुकर व्हावे यासाठी अध्ययन साहित्य निर्मिती, अध्ययन अध्यापन पद्धती याबाबत संबंधित शिक्षकांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन उपलब्ध करून देणे व संदर्भ साहित्य संकलन व विकसन करणे. ते देण्याची योजना तयार करणे व त्यांची अंमलबजावणी करणे अभ्यास गट निश्चित करणे. त्यातील व्यक्तींची निवड अंतिम करणे.
- राज्यातील आय.टी. विषयाची अध्ययन अध्यापनाची पातळी उंचावण्यासाठी सहाय्यभूत असणाऱ्या विविध प्रकारच्या साधनस्त्रोतांचे विकसन करून ते राज्यातील शिक्षक विध्यार्थी इतर सर्व यासाठी योजना तयार करणे, संबंधित घटकांना उपलब्ध करून देणे.
- उपक्रमांची अंमलबजावणी सुरु असताना सर्व स्तरावर भेटी देणे (शाळा, तालुका, जिल्हा, विभाग)
अधिव्याख्याता : गट ब
- उपक्रम/ प्रशिक्षण गरजा ठरविण्यासाठी पद्धत निश्चित करणे.
- प्रशिक्षणाचा घटक संच तयार करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ निश्चिती करणे घटक संच तयार करण्यात मदत करणे.
- प्रशिक्षण लाभार्थीची संख्या व माहिती प्राप्त करून घेणे, प्रशिक्षण साहित्य निर्मिती करून घेण्याबाबतची कार्यवाही व वितरण पूर्ण करणे.
- प्रशिक्षणाचे राज्यस्तर जिल्हास्तर तालुकास्तरचे नियोजन करणे.
- प्रशिक्षण परिणाम कारकता तपासणी कार्यात मदत
- विभागात वर्षभर घ्यावयाचे उपक्रम, वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करणेसाठी मदत करणे.
- सोपविलेल्या कामाचे महत्वाचे, अतिमहत्वाचे असे वर्गीकरण करणे. कामाची विभागणी करणे त्याबाबतचा आढावा घेणे, कार्यालयातील इतर विभागाची मदत घेणे.
- वरिष्ठांनी, वरिष्ठ कार्यालयाने विभागवार सोपविलेली कामाची जबाबदारी वेळेत पूर्ण करणे.
अधिक्षक, राज्यस्तरीय संस्था यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या (शासन निर्णय १२ जून २०१७)
प्रशासकीय जबाबदाऱ्या :
- राज्यस्तरीय संस्था यांचे अधिनस्त गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी हाताळणे.
- राज्यस्तरीय संस्था यांचे अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
- कार्यालयीन मालमत्ता, वाहने यांची देखभाल करणे.
- कार्यालयातील अधिनस्त कर्मचा-यांची दफ्तर तपासणी करणे.
- वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय साधणे.
- कार्यालयातील सर्व प्रशासकीय कामाचे नियंत्रण करण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांना मदत करणे.
- (KRA), लक्ष्य आणि उदिष्टे या बाबी लक्षात घेवून कामाचे वार्षिक नियोजन नियंत्रक अधिकारी यांना सादर करणे व पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे.
- शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद संबंधित न्यायालयीन प्रकरणे, विधानसभा कामकाज, नियतकालिक अहवाल, चौकशी प्रकरणे या संदर्भातील कार्यवाही नियंत्रक अधिकाऱ्यामार्फत विहित मुदतीत सादर करणे व कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करणे.
शैक्षणिक कामे
- कार्यालय प्रमुखांच्या आदेशानुसार अधिनस्त कार्यक्षेत्रातील शाळांच्या संदर्भातील पत्रव्यवहार करणे.
- शिक्षण व प्रशिक्षण विषयक माहितीचे सर्व संकलन करणे.
- वरिष्ठ अधिकारी व अधिनस्थ कर्मचारी यांच्या मदतीने शैक्षणिक गुणवत्ताविषयक उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मदत करणे.
- विविध तक्रारी व न्यायालयीन प्रकरणे, विधी मंडळ, संसद इत्यादिविषयी माहिती विहित मुदतीत सादर करणे.
- शिक्षण हक्क कायदा, शासनाच्या नवीन योजना, शिक्षणविषयक तरतुदीतील सुधारणा, माहिती अधिकार विषयक प्रशिक्षण, उद्बोधन वर्ग यांच्या आयोजन व प्रशासन यासंदर्भात नियंत्रण अधिकारी यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करणे.
आर्थिक बाबी :
- राज्यस्तरीय संस्था यांचे अधिनस्त सर्व लेखाविषयक बार्बीची हाताळणी करणे.
- प्रलंबित लेखा आक्षेप, उपयोगिता प्रमाणपत्रे, संक्षिप्त व तपशीलवार देयके यांची पूर्तता करून घेणे.
- भविष्य निर्वाह निधी लेखे पडताळणी प्रस्ताव सादर करणे.
- लेखाविषयक नोंदी कॅशबुकमध्ये घेणे.
- लेखाधिकारी यांच्या समन्वयाने / कार्यालय प्रमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करणे.