सेवापुर्व शिक्षण विभाग



विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेकडे सोपविण्यात आलेल्या कामाचे वाटप

विभागाचे नाव : सेवापूर्व विभाग उपविभागाचे नाव :- सेवापूर्व विभाग
दि.08.05.2024
अ.न. विभाग प्रमुखाचे नाव व पदनाम उपविभाग प्रमुखाचे नाव व पदनाम गट-ब मधील नियंत्रण अधिका-यांचे नाव व पदनाम गट-क/गट-डमधील अधिनस्त कर्मचा-यांचे नाव व पदनाम गट-क / गट-डमधील कर्मचा-यांकडे सोपविण्यात आलेले विषय/कामकाज
1 2 3 4 5 6
१.
(कक्ष-१)
(उपविभाग प्रमुख) (अधिक्षक वर्ग-२)
(वरिष्ठ लिपिक)
१) लेखाशिर्ष २२०२००८४, २२०२०११९, २२०२०१६४ या लेखाशिर्षाची चारमाही, आठमाही, अकरामाही सुधारित अंदाजपत्रक तयार करणे.

२) सदर लेखाशिर्षाखाली प्राप्त होणा-या तरतुदींचे वाटप करणे. सदर लेखाशिर्षाखाली कमी/जादा खर्च झाल्यास संबंधिताकडून खुलासा प्राप्त करून तो वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

३) संबंधित लेखाशिर्षांचे झालेल्या खर्चाचा ताळमेळ घालणे.

४) विनियोजन लेखा अहवाला संदर्भात संबंधित कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून ती शासनास सादर करणे.

५) महालेखाकार कार्यालयाकडून निघणा-या शंकांची पूर्तता करणे.

६) डी.टी.एड प्रवेशाबाबत रोजकिर्द व लेखे ठेवणे व तदनुषंगिक पत्रव्यवहार पाहणे.

७) डी.टी.एड प्रवेशास झालेला अनुषंगिक खर्चाची टिपणी सादर करून देयक पारित करून धनादेश देणे.

८) आकस्मिक खर्चाचे देयके पारित करणे व जाहिरात देयके अदा करणे.(विभागीय/राज्यस्तरीय)

९) प्रवेश अर्जाची छपाई खर्च व विक्रीतून आलेल्या रक्कमेचा हिशोब ठेवणे.

१०) शि.शि.प्र.विभागांतर्गत असलेले भांडार बाबतचे काम पहाणे.

११) डी.टी.एड. प्रवेश निवड, निर्णय समितीच्या लेख्यांचे लेखा परिक्षण सनदी लेखापाल (C.A) यांचेकडून विहीत वेळेत त्याच वर्षी करून घेणे. तसेच GST/IncomeTax संबंधित मासिक भरणा रक्कम चलनाद्वारे बँकेत जमा करून लेखा शाखेत मासिक/ वार्षिकअहवाल सादर करणे.

१२) शि.शि.प्र. विभागासाठी लागणारे साहित्य खरेदीची माहिती संकलित करून भांडार शाखेस कळविणे व भांडार शाखेकडून प्राप्त साहित्याचा हिशोब ठेवणे.

१३) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना आवश्यकतेनुसार संगणक, फर्निचर व इतर आवश्यक ते साहित्य ६० टक्के रक्कमेमधून खरेदी करून पुरवठा करणे.

१४) शि.शि.प्र. विभागाने आयोजित केलेल्या सभा/प्रशिक्षणे यासाठी चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था करणे.

१५) बँकेची सर्व लेखाविषयक कामे स्वत: बँकेमध्ये जावून करणे.

१६) डी.एल.एड चे एसबीआय खात्याचा संपूर्ण व्यवहार पहाणे मासिक जमा खर्च विवरण पत्र बँकेकडून प्राप्त करून घेणे.

१७) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे सबलीकरणाचे कामकाज चालू असल्याने इमारत बांधकामाच्या संदर्भातील सर्व कामे.

१८) विभागातील कुशल/अकुशल कामगारांच्या कंत्राट दाराची नेमणूक करणे संबंधी कार्यवाही करणे तसेच कंत्राट दाराचे मासिक देयक पारित करणे. कुशल/अकुशल कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी / ECS संबंधी माहिती संकलन करणे.

१९) शासकीय अध्यापक विद्यालये व शासकीय सराव पाठशाळा संबंधीत पत्र व्यवहार पहाणे.

२0) कक्ष/टेबलनिहाय विधानसभा/विधानपरिषद तारांकित /अतारांकित प्रश्न, कपात सूचना, लोकायुक्त प्रकरणे, लक्षवेधी सूचना यांचे संकलन करणे व त्यावर कार्यवाही करणे.

२१) केंद्र सरकार नवी दिल्ली यांना सादर करावयाच्या शिक्षक शिक्षण योजनेच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक AWP&B संबधित संपूर्ण पत्रव्यवहार करणे

२.
(कक्ष-२)
(उपविभाग प्रमुख) (अधिक्षक वर्ग-२)
(मुख्य लिपीक)
१) विभागातील सर्व कोर्ट केसेस.

२) समन्वय ठेवून तात्काळ माहिती शासनास सादर करणे.

३) चौकशी/तक्रारी प्रकरणे यांचा तात्काळ निपटारा करणे.

४) अध्यापक विद्यालय भेटी/तपासणी अहवालाचे संकलन करणे.

५) अध्यापक विद्यालय मान्यता काढून घेणेबाबतचा पूर्ण पत्रव्यवहार पाहणे.

६)विधानसभा/विधानपरिषद तारांकित/अतारांकित प्रश्न/कपात सूचना यांची माहिती तात्काळ संकलित करून शासनास सादर करणे.

७)मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या तक्रारी उदा. वेतन श्रेणी, सेवा जेष्ठता, काढून टाकणेबाबतचे पत्रव्यवहार करणे.

८) अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अल्पसंख्यांक बाबतीत शासन स्तरावरून होणारा उपरोक्त विभागाचा पत्रव्यवहार पाहणे.

९) लोकायुक्त प्रकरणांचा निपटारा करणे.

१०) माहिती अधिकारातील अर्जावर कार्यवाही करणे.

११)अशासकीय विनाअनुदानीत अध्यापक विद्यालयांच्या फी वाढीबाबत नियुक्त केलेल्या अध्यापक विद्यालय विनियमन प्राधिकरणाबाबतचे सर्व कामकाज पहाणे.

१२) अध्यापक विद्यालयाच्या शुल्कवाढीच्या प्रस्तावावर कार्यवाही करणे.

१३) खाजगी अनुदानित, शासकीय अध्यापक विद्यालयातील, सराव पाठशाळेतील व प्राथमिक विस्तार सेवा केंद्रातील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वेतन वगळता इतर सर्व प्रकारच्या प्रकरणांवर कार्यवाही करणे.

१४)अनुदानित अध्यापक विद्यालयांना एन.सी.टी.ई. च्या निकषाप्रमाणे कर्मचारी वर्ग उपलब्धतेसंदर्भात कार्यवाही करणे.

१५) सेवापूर्व शिक्षण विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यवाटप/ दैनंदिन कार्य अहवाल /विभागा अंतर्गत आढावा बैठक इत्यादी संबंधी पत्र व्यवहार पहाणे.

१६) विद्यालयांच्या (एन.सी.टी.ई) संदर्भात नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करणे.

१७) अध्यापक विद्यालयांची Recognition Order संकलित करणे व त्यावर कार्यवाही करणे.

१८) एन.सी.टी.ई.च्या संदर्भात उपरोक्त विभागातील अध्यापक विद्यालयांचा पत्रव्यवहार पाहणे.

१९) एन.सी.टी.ई. च्या संदर्भातील विभागातील सर्व कामे उदा.डी.टी.एड. कॉलेज स्थलांतर प्रस्तावावर कार्यवाही करणे, नावांत बदल, माध्यम बदल, पत्ता बदल इ.

२0) राज्यातील २९१ डी.टी.एड कॉलेजच्या संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या कोर्ट केसेसच्या संदर्भात कक्ष 4 च्या मदतीने कार्यवाही करणे .

२१) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांचेकडून सभेच्या वेळी प्राप्त माहितीचे संकलन करणे व कक्षनिहाय संबंधीतांना वाटप करणे.

२२) एन.सी.टी.ई., भोपाळ, नवी दिल्ली व केंद्रीय मानव संसाधन व विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या सभांची माहितीचे एकत्रिकरण करणे.

२३) उपरोक्त विषयाशी संबंधीत व कक्षाशी संबंधीत सर्व विधानसभा/विधानपरिषद तारांकित/अतारांकित प्रश्न, कपात सूचना, लोकायुक्त प्रकरणे, लक्षवेधी सूचना यांचे संकलन करणे व त्यावर कार्यवाही करणे.

२४) नव्याने शासन मान्यता मिळालेल्या अध्यापक विद्यालयांना मान्यता पत्र देणे.

२५) शिशिप्र शाखेतील सर्व कक्षातील सर्व प्रकारच्या प्रलंबित प्रकरणांची माहिती घेऊन अधीक्षकांकडे सादर करणे व प्राधान्यक्रमानुसार निपटारा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे.

२६)माहिती अधिकारातील शाखेतील प्रकरणांचे संकलन करणे व एकत्रित माहिती सादर करणे. सहायक शासकीय माहिती अधिकारी म्हणून काम करणे.

३.
(कक्ष-३)
(उपविभाग प्रमुख) (अधिक्षक वर्ग-२)
(कनिष्ठ लिपिक)
१) राज्यातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे साधारण लेखाशीर्ष २२०२०६१२ व २२०२०६२१ आणि एससी व एसटी लेखाशीर्षाची चारमाही, आठमाही अकरामाही सुधारित अंदाजपत्रक तयार करून ते वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

२) सर्व साधारण लेखाशीर्ष २२०२०६१२ व २२०२०६२१ आणि एससी व एसटी लेखाशीर्ष प्राप्त अनुदानाचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थानिहाय वाटप करणे

३)सर्व साधारण लेखाशीर्ष २२०२०६१२ व २२०२०६२१ आणि एससी व एसटी लेखाशीर्षाचे खर्चाचा महालेखाकार १.मुंबई व २. नागपूर येथे जाऊन ताळमेळ करणे

४)उपरोक्त लेखाशिर्षांचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे

५) केंद्र शासनाकडील केंद्र शासनाचा हिस्सा प्राप्त करण्यासाठी पत्रव्यवहार करणे.

६) केंद्र शासनास व राज्य शासनास खर्चाचा त्रैमासिक प्रगती अहवाल सदर करणे

७)वरील लेखाशिर्षाचा मासिक प्रगती अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांकडून प्राप्त करणे

८)पुढील वर्षाचे वार्षिक आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे

९)पंचवार्षिक योजनांची माहिती तयार करणे

१०) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांना सबलीकरणानुसार विविध लेखाशिर्षाखाली अनुदान वाटप करणे व त्याप्रमाणे त्यांचेकडून प्रस्ताव प्राप्त करणे .

११)महालेखापाल, नागपूर व महालेखापाल,मुंबई यांच्याकडून झालेल्या तपासणीमध्ये आक्षेप उत्पन्न झाल्यास सदर आक्षेपाची पूर्तता करणे .

१२) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी डी.टी.एड.अर्ज विक्रीच्या १० टक्के रक्कमेच्या खर्च करण्याच्या (विवध खरेदी, सुरक्षा रक्षक नेमणुका , सफाई कामगार नेमणुका इ.)कार्यवाहीबाबतची प्रशासकीय मान्यता घेणे.

१३) शिक्षक शिक्षण योजनेच्या खर्चाची माहिती प्रबंधनपोर्टलवर (मासिक व वार्षिक) भरण्याबाबतची कार्यवाही करणे.

१४)महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने नियुक्त केलेल्या सनदी लेखापालाकडून शिक्षक शिक्षण योजनेच्या प्राप्त व वितरीत अनुदानाचे अंकेक्षण करून घेणे.

१५) प्राचार्य डायट सर्व यांच्या राज्यस्तरीय सभेचे आयोजन करणे.

१६) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची सर्व सांख्यिकी माहिती संकलित करणे.

१७) माहिती अधिकारातील शाखेतील प्रकरणांचे संकलन करणे व एकत्रित माहिती सादर करणे. सहायक शासकीय माहिती अधिकारी म्हणून काम करणे.

१८) उपरोक्त विषयाशी संबंधीत व कक्षाशी संबंधीत सर्व विधानसभा /विधानपरिषद तारांकित/अतारांकित प्रश्न, कपात सूचना, लोकायुक्त प्रकरणे, लक्षवेधी सूचना यांचे संकलन करणे व त्यावर कार्यवाही करणे
४.
(कक्ष-४)
(उपविभाग प्रमुख) (अधिक्षक वर्ग-२)
(कार्यशाळासहाय्यक)
१) संपूर्ण डी.टी.एड केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविणे.

२)राज्यातील अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र पडताळणी व त्यासंबंधीचा पत्रव्यवहार.

३) प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन (संगणीकरण) करणे.

४) प्रवेशासंबंधीत सर्व तक्रारी/कोर्ट प्रकरणे/लोकायुक्त प्रकरणे / विधानसभा/विधानपरिषद तारांकित/अतारांकित प्रश्न यावर तात्काळ कार्यवाही करणे.

५) प्रवेशासंबंधी प्राप्त सर्व धनाकार्षावर रजिस्टर (नोंद वही) ठेऊन त्यावर कार्यवाही करणे.+ÉìxɱÉÉÉ º]äõ]õ¨Éå]õ PÉähÉä.

६) प्रवेशासंबंधातील समिती बैठकीची पूर्वतयारी करणे.

७) प्रवेश प्रक्रियेचे कामकाज पाहणा-या संगणक संस्थांच्या निविदाबाबत संपूर्ण कामकाज करणे.

८) राज्यस्तरीय व विभागस्तरीय डी.टी.एड प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व पत्रव्यवहार करणे.

९) डी.टी.एड प्रवेशासंदर्भात आलेल्या सर्व प्रकारचे तक्रारी अर्ज स्विकारणे व त्यावर कार्यवाही करणे.

१०) राज्यस्तरीय डी.टी.एड प्रवेश निवड निर्णय व संनियंत्रण समितीच्या बैठकीच्या संदर्भातील सर्व कामे

११) केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश रद्द झालेने करावयाच्या शुल्क कपातीबाबतचा पत्रव्यवहार करणे व त्यावर कार्यवाही करणे.

१२) डी.टी.एड प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष पुर्नप्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्याचे कामकाज पहाणे.

१3) सर्व विभागातील व्यवस्थापन कोटा प्रवेश, शासकीय कोटा प्रवेश, सुनावणी मान्य/अमान्य कळविणेबाबतचा संपूर्ण पत्रव्यवहार पहाणे.

१4) मानव संसाधन व विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचे सूचनेनुसार अध्यापक विद्यालयांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे.

१5) अध्यापक विद्यालयांचे जिल्हा सांकेतिकीकरणाचे(State Code) काम पहाणे.

१6) प्रवेशाच्या संदर्भातील माहिती अधिकारीतील अर्जावर कार्यवाही करणे.

१7) संपूर्ण राज्यातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे अध्यापक विद्यालय एकतर्फी बदलीबाबत कार्यवाही करणे.

१8) संपूर्ण राज्यातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे आपआपसातील बदली संदर्भात कार्यवाही करणे.

19) संपूर्ण राज्यातील प्राप्त प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या बदलीचे डी.डी. चे रजिस्टर ठेवणे, नोंद घेणे व डी.डी.बँकेत जमा करणे.

२0) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांकडून आलेले एकतर्फी व आपआपसातील बदलीचे डी.डी.चे रजिस्टर ठेवणे, नोंद घेणे व डी.डी बँकेत जमा करणे.

२1) प्रवेशाच्या संदर्भातील वाहतूक बिले व इतर सर्व बिले यावर कार्यवाही करणे.

२2) नवीन अध्यापक विद्यालयांच्या माहितीचे रजिस्टर अद्ययावत ठेवणे.

२3) एन.सी.टी.ई. ने मान्य केलेल्या जादा तुकड्यांची माहिती अद्ययावत ठेवणे.

२4) संपूर्ण राज्यातील विभागनिहाय व जिल्हानिहाय अध्यापक विद्यालयांची अनुदानित, शासकीय, विना अनुदानित याप्रमाणे अद्ययावत संख्या व त्यामधील प्रवेश क्षमता यांची माहिती ठेवणे.

२5) प्रवेश प्रक्रियेसंबंधीतन्यायालयीन प्रकरणाचा पत्र व्यवहार पहाणे.

२6) माहिती अधिकारातील शाखेतील प्रकरणांचे संकलन करणे व एकत्रित माहिती सादर करणे. सहायक शासकीय माहिती अधिकारी म्हणून काम करणे.

२7) उपरोक्त विषयाशी संबंधीत व कक्षाशी संबंधीत सर्व विधानसभा/विधानपरिषद तारांकित/अतारांकित प्रश्न, कपात सूचना, लोकायुक्त प्रकरणे, लक्षवेधी सूचना यांचे संकलन करणे व त्यावर कार्यवाही करणे.

२8) डी.टी.एड विद्यार्थ्यांचे खंड क्षमापित करणे.
५.
(कक्ष-५)
(उपविभाग प्रमुख) (कार्यक्रम अधिकारी वर्ग -२)
(कनिष्ठ लिपिक)
१) निष्कासित SBTE विभागातील समकक्षता संबंधी पत्रव्यवहार पहाणे.

२)डी.एल.एड अभ्यासक्रमनिश्चिती व पुनर्रचना संबंधीत पत्रव्यवहार पहाणे.

३)उपरोक्त विषयाशी संबंधीत सर्व विधानसभा/विधानपरिषद तारांकित/अतारांकित प्रश्न, कपात सूचना, लोकायुक्त प्रकरणे, लक्षवेधी सूचना यांचे संकलन करणे व त्यावर कार्यवाही करणे.

४)माहिती अधिकारातील उपरोक्त विषयासंबंधीतप्रकरणांचे संकलन करणे व एकत्रित माहिती सादर करणे.

५) प्राचार्य, जेष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यांच्या विभागीय परिक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करणे.

६) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने प्रत्येक वर्षात आयोजित करावयाची अल्पमुदत प्रशिक्षणाची माहिती संकलित करणे व त्यास मान्यता देणे.

७) माहिती अधिकारातील शाखेतील प्रकरणांचे संकलन करणे व एकत्रित माहिती सादर करणे. सहायक शासकीय माहिती अधिकारी म्हणून काम करणे.

८) उपरोक्त विषयाशी संबंधीत व कक्षाशी संबंधीत सर्व विधानसभा/विधानपरिषद तारांकित/अतारांकित प्रश्न, कपात सूचना, लोकायुक्त प्रकरणे, लक्षवेधी सूचना यांचे संकलन करणे व त्यावर कार्यवाही करणे.

९) सेवापूर्व विभागाचा संकलित वार्षिक अहवाल मराठी व इंग्रजीतून करणे.

१०) राज्यातील डी.टी.एड कॉलेजच्या वार्षिक सुट्ट्यांचे परिपत्रक काढणे.
६.
(कक्ष-६)
(उपविभाग प्रमुख) (कार्यक्रम अधिकारी वर्ग -२)
(कनिष्ठ लिपिक)
१) राज्य स्तरावरील एनआयओएस डी.एल.एड. स्वतंत्र कार्यभार (३४ डायटसंलग्न एनआयओएस १०७ अभ्यासकेंद्राचे नियंत्रण) तसेच विभाग प्रमुख यांच्या आदेशानुसार विविध कक्षेसंबंधीत सोपविण्यात आलेली कामे.

२) सेवापूर्व शिक्षण विभागाशी संबंधीत शासन निर्णय / परिपत्रके संकलित करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करणे.

३) माहिती अधिकारातील शाखेतील प्रकरणांचे संकलन करणे व एकत्रित माहिती सादर करणे. सहायक शासकीय माहिती अधिकारी म्हणून काम करणे.

४) उपरोक्त विषयाशी संबंधीत व कक्षाशी संबंधीत सर्व विधानसभा/विधानपरिषद तारांकित/अतारांकित प्रश्न, कपात सूचना, लोकायुक्त प्रकरणे, लक्षवेधी सूचना यांचे संकलन करणे व त्यावर कार्यवाही करणे.
७.
(कक्ष-७)
(उपसंचालक) (उपविभाग प्रमुख) (अधिक्षक वर्ग-२)
(कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर)
शिशिप्र विभागातील कक्ष १,२,३ व ४ (३४ ट) अंतर्गत टंकलेखन, डाटा एन्ट्री एनआयओएस विभागातील टंकलेखन, डाटा एन्ट्री बालशिक्षण/मानसशास्त्र विभागातील टंकलेखन, डाटा एन्ट्री एसबीटीई विभागातील टंकलेखन, डाटा एन्ट्री
८.
(कक्ष-८)
(उपसंचालक) (उपविभाग प्रमुख) -----
(शिपाई)
मा. उपसंचालक (सेवापूर्व शिक्षण) यांचे दालन
९.
(कक्ष-९)
(उपसंचालक) (उपविभाग प्रमुख) (अधिक्षक वर्ग-२)
(कंत्राटी शिपाई)
कक्ष १ ते ४ (३४ ट )/उपविभागप्रमुख सेवापूर्व विभाग/बालाशिक्षण व मानसशास्त्र उपविभागप्रमुख/अधिक्षक व एसबीटीई यांचे दालन

Initiatives/Affiliations