वसतीगृह विभाग
विभागाची स्थापना :-
माहे जानेवारी, १९६४ मध्ये राज्यातील प्रामुख्याने शिक्षणाचा दर्जा / गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य
शिक्षणशास्त्र संस्था या नावाने संस्था स्थापन करण्यात आली. त्याचवेळेस राज्य स्तरीय प्रशिक्षणसाठी
उपस्थित प्रशिक्षणार्थीच्या निवासाची व्यवस्था संस्थेमध्ये करण्यासाठी वसतीगृह विभागाची स्थपना करण्यात
आली.
विभागाची संरचना / पदसंरचना :-
१. |
विभागाचे नाव |
मानव संसाधन विभाग |
२. |
उप विभागाचे नाव |
वसतीगृह विभाग |
अधिकारी/कर्मचारी पदनाम, नाव व भ्रमणध्वनी क्रमांक
अ.क्र. |
पदनाम |
नाव |
भ्रमणध्वनी क्रमांक |
१ |
उपसंचालक (मानव संसाधन) |
|
|
२ |
प्रशासन अधिकारी |
|
|
३ |
सहा. वसतीगृह प्रमुख |
|
|
४ |
मुख्य लिपिक |
|
|
महत्त्वाचे शासन निर्णय:-
१) शालेय शिक्षण विभागाचा शा.नि. दि.०१ जून, २००६ नुसार परिषदेतील नव्याने बांधण्यातील आलेल्या
अतिथीगृहातील निवासी शुल्क अकरण्यात येत होते, त्यानंतर परिषदेच्या आवारातील निवासठी शुल्कात वेळोवेळी
वाढ करण्यात आलेली आहे.
२) शालेय शिक्षण विभागाचा शा.नि.दि.२.५.२०२४ नुसार मा.आयुक्त (शिक्षण) यांना परिषदेतील वसतीगृह निवास
शुल्कामध्ये वाढीसंबंधी परवानगी देण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार मा. आयुक्त (शिक्षण) यांनी दि.१.४.२०१७
च्या आदेशान्वये वसतीगृहातील निवासशुल्क निश्चित केले आहेत.
३) शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दि.२९ जानेवारी, २०१४ नुसार राज्यातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी
यांचे नवीन प्रशिक्षण धोरण जाहिर करण्यात आले आहे.
४) सामान्य प्रशासन विभागाचा शा.नि. दि.०१.११.२०१४ नुसार यशदा ही महसुल विभागासाठी राज्यस्तरावरील
प्रशिक्षणाची शिखर संस्था आहे. त्याचप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
ही शिक्षण विभागाची शिखर संस्था आहे. सामान्य प्रशासन विभागाचा शा.नि. दि.२४.०७.२०१७ नुसार
राज्यस्तरवरील यशदा संस्थेच्या प्रशिक्षण शुल्क दराप्रमानेच परिषदेने प्रशिक्षणासाठी दर लागू केले आहेत
विभागाची उद्दिष्ट्ये :-
शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दि.२९.०१.२०१४ नुसार शालेय शिक्षण राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ही राज्यातील प्रशिक्षणाची शिखर संस्था म्हणून घोषित
करण्यात आली असून, प्रशिक्षणाधीना दर्जेदार मुलभुत सोईसुविधा उपलब्ध करुन दद्यावयाच्या आहे. सद्यस्थितीत
कार्यालयाच्या आवारातील इमारतीच्या बांधकाम, नुतनीकरण व अंतर्गत सजावटीनंतर होणा-या मूलभूत सोयी-सुविधा
अंतर्गत परिषदेमध्ये उपलब्ध असणारी सभागृहे, प्रशिक्षणार्थीची निवासव्यवस्था, कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळ,
याची माहिती खालीलप्रमाणे आहे
परिषदेमधील सभागृहे व तेथील प्रशिक्षणावीच्या बैठकव्यवस्था, निवास व्यवस्था यांची माहिती खालीलप्रमाणे
आहे
अ) सभागृहांची माहिती :-
अ.क्र. |
सभागृहाचे नाव- |
सभागृहातील बैठकव्यवस्था संख्या |
सभागृह AC/Non AC |
१ |
महात्मा फुले सभागृह |
१०० |
AC |
२ |
स्टेप हॉल |
४० |
AC |
३ |
समिती कक्ष |
६० |
AC |
४ |
शिवनेरी सभागृह (दृक-श्रवण इमारतीमधील स्टेप हॉल) |
७० |
AC |
५ |
प्रतापगड (पत्रव्दारा इमारतीमधील हॉल) |
८० |
Non AC |
६ |
व्हीव्हीआयपी गेस्टहाऊसमधील होल |
४० |
AC |
७ |
डीपीईपी हॉल (दृक-श्रवण इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील हॉल) |
२७ |
AC |
|
एकूण बैठक व्यवस्था |
४१७ |
|
ब ) प्रशिक्षणार्थीची निवासव्यवस्थेची माहिती खालीलप्रमाणे :-
अ.क्र. |
निवासव्यवस्था इमारत नाव |
प्रशिक्षणाचींची होणारी निवासव्यवस्था संख्या |
सभागृह AC/Non AC |
१ |
अतिथीभवन |
९० |
Non AC |
२ |
पुरुष वसतीगृह (जुने) |
८० |
Non AC |
३ |
पुरुष वसतीगृह (नवीन-जुनी सेवापूर्व इमारत) |
८० |
Non AC |
४ |
व्हीव्हीआयपी गेस्टहाऊस |
१० |
AC |
|
एकूण बैठक व्यवस्था |
२६० |
|
वरीलप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे प्रशिक्षणार्थीीच्या प्रशिक्षणाची व निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.
विभागातील कामे / उपक्रम
• परिषदेच्या आवारातील सर्व इमारतींची देखभाल व दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करुन घेण्याची
कार्यवाही करणे.
• परिषदेच्या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी शासनाकडून गौण बांधकामे या लेखाशीर्षाखाली तरतूद प्रस्तावित
करुन मंजूर करुन घेणे.
• परिषदेतील स्त्री/पुरुष वसतिगृहाची देखरेख ठेवण्यासाठी कंत्राटी कर्मचारी नियुक्त करुन त्यांचेवर नियंत्रण ठेवणे.
• परिषदेतील बैठकीसाठी उपलब्ध सभागृहांचे आरक्षण करणे व त्यांच्या नोंदी रजिस्टरमध्ये ठेवणे.
• आवारातील निवासस्थानचे वाटप करणे.
• परिषदेच्या आवारातील कंपन, वीज लाईन्स यांची देखभाल व दुरस्तीकराच्या कामी नियोजन करणे.
• पषिदेतील दैनंदिन स्वच्छता / साफ-सफाईची कामे करण्यासाठी बाह्ययंत्रणेमर्फत मनुष्यबळ नियुक्त करणे, व त्यांचेकडून स्वच्छत करुन घेणे.
• परिषदेतील बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त सुरक्षा रक्षक, स्वच्छता साफ-सफाई व वसतीगृह मदतीस यांचे मासिक देयक अदा करणे.
• वसतीगृह विभाकडे जमा होणारी रोकड परिषदेच्या बैंक खात्यात जमा करणे.
• वीज देयक, पाणीपट्टी यांचा भरणा करणे
फोटोगॅलरी
परिषदेतील अतिथीभवन वसतीगृह, पुरुष वसतीगृह, सेवापूर्व वसतीगृह व व्ही. आय.पी. वसतीगृह इमारतीचे फोटो सोबत जोडले आहेत