मराठी विभाग



विभागाची स्थापना :-

शासन निर्णय दि. १७ ऑक्टोबर २०१६ नुसार राज्य शैक्षाणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ,पुणे यातील विभागांची पुनर्रचना करण्यातआली व त्यानुसार भाषा विभाग अंतर्गत मराठी भाषा विभाग सुरु करण्यात आला


विभागाची संरचना / पदसंरचना :-
पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे
प्राचार्य
वरिष्ठ अधिव्याख्याता
अधिव्याख्याता
विषय सहायक
लिपिक /डाटाएन्ट्रीऑप.
कंत्राटीनियुक्तीने(CSR)
शिपाई

महत्त्वाचे शासन निर्णय

१) मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करणेबाबत

    • शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण 2019/प्रक्र.78/एसडी 4, दिनांक 1 जून, 2020.

    • शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण -2024/प्र.क्र.96/एस.डी.-4, दिनांक २८ फेब्रुवारी, 202४.

२)बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेररका यांचेशी झालेल्या सामंजस्य कराराची अमंलबजावणीबाबत

    • शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण -2024/प्र.क्र.43/एसडी-4, दिनांक 29 जानेवारी,२०२४ जर्मनीतील

३)बाडेन व्युटेन बर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्याबाबत

    • शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण -2024/प्र.क्र.५१/एसडी-६, दिनांक ११ जुलै, २०२४

४)एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर व टोक्यो मराठी मंडळ , जपान यांचेशी झालेल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याबाबत

    • शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण -2024/प्र.क्र.4९/एसडी-4, दिनांक 16 जुलै, २०२४

५)महाराष्ट्र मंडळ लंडन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य कराराची अमलबजावणी करण्याबाबत

    • शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण -2024/प्र.क्र.4८/एसडी-4, दिनांक 16 जुलै, २०२४

महत्त्वाचे शासन निर्णय
    1. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील मराठी विषय शिक्षकांना प्रशिक्षण देऊन मराठी विषय अध्यापनामध्ये सक्षम करणे.

    2. शिक्षकांसाठी मराठी विषयाच्या संदर्भाने सेवांतर्गंत प्रशिक्षणांचे नियोजन व आयोजन करणे.

    3. मराठी विषयासाठी विविध माध्यमांतून अध्यापन व अध्ययन पूरक साहित्य निर्मिती करणे.

    4. विविध खासगी संस्था तसेच स्वयंसेवी संस्था यांचे मार्फंत राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच त्यांच्याद्वारे निर्मित साहित्य,विविध प्रस्ताव याबाबत अभिप्राय सादर करणे.

    5. मराठी विषय संबंधित राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध अहवाल, प्रकाशन, धोरण, उपक्रम याबाबत अभ्यासपूर्ण अभिप्राय सादर करणे

विभागातील कामे/उपक्रम :-

१)उपक्रमाचे नाव : विद्याप्रवेश (शाळा पूर्व तयारी कार्यक्रम )


भिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या इयत्ता पहिलीत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेसाठी पूर्वतयारी करणेसाठी प्रोत्साहन देणे व इयत्ता पहिलीत प्रविष्ट विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीतील प्रवेश सहजसुलभ करणे या करिता शाळा पूर्व तयारी अभियान राबविण्यात आले व त्या द्वारे विद्यार्थ्यासाठी योग्य अध्ययन वातावरणाची निर्मिती करण्यात आली.

• उपक्रमाची उद्दिष्टे :
    1.भिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या इयत्ता पहिलीत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेसाठी पूर्वतयारी करणे साठी प्रोत्साहन देणे.

    2. इयत्ता पहिलीत प्रविष्ट विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीतील प्रवेश सहजसुलभ करणे.

    3.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना खेळाधारित आणि विद्यार्थ्यांच्या वय आणि विकास अवस्थेस अनुसरून अध्ययन अनुभूती प्रदान करणे.

    4.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भाषिक क्षमता विकासाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने खेळ आधारित दृष्टीकोनाचा वापर करणे.
• उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप
    १)इयत्ता पहिलीत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ सदस्यांचा गट तयार करण्यात आला.

    २)सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक मार्गदर्शिका आणि विद्यार्थी कृतिपुस्तिका विकसनची उद्दिष्टे समजून देण्यात आली. तज्ज्ञांकडून व मागील वर्षी तज्ञ व्यक्तींनी सुचविलेल्या सुधारणा यांच्या साह्याने गुणवत्ता समीक्षण करण्यात आले.

    ३)कृतिपुस्तिकांची छपाई करण्यात येवून मे २०२२ अखेर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच त्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना वितरीत करण्यात आले .

    ४)सलग तीन महिने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता प्रयत्न करण्यात आले.
    • समग्र शिक्षा प्रकल्पांतर्गत सन २०२३-२४ मध्ये मराठी माध्यमातील स्थानिक स्वराज्य संस्थातील व शासकीय शाळातील ८६८५२२ विद्यार्थी त्या शाळेतील इयत्ता पहिलीच्या अध्यापन करणारे एकूण ६१४१९ शिक्षकयांना या पुस्तिकेचे वाटपकरण्यात आले.

    • स्टार्स प्रकल्पांतर्गत सन २०२४-२५ मध्ये मराठी माध्यमातील स्थानिक स्वराज्य संस्थातील व शासकीय शाळातील विद्यार्थ्यांना विद्यार्थी कृती पुस्तिका ६,६९,९०८ (इयत्ता १ विद्यार्थी संख्या) या पुस्तिकेचे वाटपकरण्यात आले.

• उपक्रमाची फलनिष्पत्ती:-
    १.भिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या इयत्ता पहिलीत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेसाठी पूर्वतयारी करणेसाठी प्रोत्साहन मिळाले.

    २.इयत्ता पहिलीत प्रविष्ट विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिलीतील प्रवेश सहजसुलभ होण्यास मदत झाली .

    ३.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना खेळाधारित आणि विद्यार्थ्यांच्या वय आणि विकास अवस्थेस अनुसरून अध्ययन अनुभूती प्रदान कशा कराव्यात याचे शिक्षक तसेच पालकांना मार्गदर्शन मिळाले.

    ४.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भाषिक क्षमता विकासाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने खेळ आधारित दृष्टीकोनाचा वापर कसा करावा याचे शिक्षकांना मार्गदर्शन होऊन विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकास करण्याच्या दृष्टीने मदत झाली

उपक्रमाचे नाव : भाषिक खेळ पुस्तिका

विद्यार्थ्याचा भाषिक विकास हा महत्वपूर्ण आहे .भाषिक विकास हा केवळ भाषिक कौशल्य विकासनापुरते मर्यादित न राहता त्यामध्ये अंदाज बांधणे,चिकित्सक विचार ,तर्क करणे विश्लेषण क्षमता या सारख्या बोधात्मक क्षमतांचा विकास होणे ही गरजेचे आहे.त्या अनुषंगाने सदर विद्यार्थ्याकरिता शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणे गरजेचे आहे.वरील उदेशाने मराठी विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या मराठी भाषा विकासनाकरिता भाषिक खेळ पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे.

उपक्रमाची उद्दिष्ट्ये :-
    १)भाषेची समज वाढविण्याकरिता भाषिक अध्ययन प्रक्रिया आनंददायी बनविणे .

    २) पायाभूत कौशल्याबरोबर आकलन,चिकित्सक विचार,तर्क करणे,उपयोजन यासारख्या उच्चबोधात्मक क्षमता विकसित करणे.

    ३)पायाभूत कौशल्य विकसनासाठी आवश्यक अध्ययन साहित्य विकसन करणे
उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप

मराठी भाषा विषयाच्या भाषिक खेळ पुस्तिका तयार करण्याकरिता तज्ञ गटाची निर्मिती करण्यात आली .इयत्ता १ ली ते ५ वी च्या मुलांच्या भाषिक विकसनाकरिता खेळावर आधारित भाषिक खेळ पुस्तिकेच्या विकसनाकरिता तज्ञ गटाच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. पुस्तिका तयार झाल्यानंतर पुस्तिकेचे समीक्षण व अन्तिमीकरण करण्यात आले. भाषिक खेळ पुस्तिकेचे विकसन झाल्यानंतर ६११२९ मराठी माध्यमाच्या शासकीय शाळांना प्रत्येकी एक पुस्तक या प्रमाणे तालुकास्तरावर वितरण करण्यात आले आहे.

उपक्रमाचे नाव : शालेय स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याच्या आकलन, चिकित्सक विचार, तर्क करणे व उपयोजन या सारख्या उच्चबोधात्मक क्षमतांचा (HOTS) विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यातील या क्षमतांच्या विकसनासाठी तसेच प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व तत्सम स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी इयत्ता 5 वी व ८ वी च्या विद्यार्थ्याकरिता मार्गदर्शक ठरणारी संदर्भ पुस्तिका तज्ञ गटाद्वारे विकसित करण्यात आलेली आहे.

उपक्रमाची उद्दिष्ट्ये :-
    १.प्रज्ञावंत विद्यार्थ्यासाठी अध्ययन साहित्य तयार करणे .

    २.शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांकरिता संदर्भ साहित्य उपलब्ध करून देणे.

    ३.विद्यार्थ्यामधील उच्च बोधात्मक क्षमतांचा विकास करणे.
उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप :-

मराठी भाषा विषयाच्या शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांकरिता संदर्भ पुस्तिका तयार करण्याकरिता तज्ञ गटाची निर्मिती करण्यात आली .इयत्ता ५ वी ते ८ वी च्या मुलांच्या उच्च बोधात्मक क्षमतांवर आधारित शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांकरिता संदर्भ पुस्तिकेच्या विकसनाकरिता तज्ञ गटाच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. पुस्तिका तयार झाल्यानंतर पुस्तिकेचे समीक्षण व अन्तिमीकरण करण्यात आले. शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांकरिता संदर्भ पुस्तिकेचे विकसन झाल्यानंतर सदर पुस्तिकेची छपाई करण्यात आली असून त्याचे राज्यातील इयत्ता ५ वीच्या ६११२९ व इयत्ता ८ वी च्या १९४७४ मराठी माध्यमाच्या शाळांना इयत्तानुसार तालुकास्तरावर वितरण करण्यात आले आहे.


फोटोगॅलरी

https://drive.google.com/drive/folders/1fZNT7-SSIXaaUY2gDHynyNp7-1CmIPmE?usp=sharing

Initiatives/Affiliations