विभागाचे नाव: अभ्यासक्रम विकसन विभाग

पार्श्वभूमी :

बदलत्या काळानुसार राष्ट्रीय, सामाजिक व वैयक्तिक गरजा विचारात घेऊन बदललेल्या उद्दिष्टांनुसार शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात बदल करून त्याची वेळोवेळी पुनर्रचना करावी लागते. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ही संस्था कार्यरत असून राज्यस्तरावर (SCERT) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ही संस्था आहे. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक व शैक्षणिक मुल्ये जपणारा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम करणारी ही संस्था आहे. अभ्याक्रमाची पुनर्रचना व नुतनीकरण याची जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये अभ्यासक्रम विकसन विभाग हा सन १९७५-७६ पासून सुरु आहे. दि.२४ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील राज्य स्तरीय संस्थांचे सक्षमीकरण करून पुनर्रचना करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार या संस्थेकडे इ.१ली ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रम निर्मिती व पाठ्यपुस्तक निर्मितीची जबाबदारी देण्यात आली आहे. अभ्यासक्रम विकसन ही जबाबदारी पार पडत आहे.

विभागाची उद्दिष्टे -:

  • ✓ नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती करणे.
  • ✓ पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करणे.
  • ✓ शिक्षकांना प्रशिक्षण देणे.

>विभागाची संरचना:

क्र पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
1 उपविभाग प्रमुख ०१ ०१
2 कार्यक्रम अधिकारी ०१ ०१
3 विषय सहाय्यक ०१ ०१
4 लिपिक / डाटा एंट्री ऑपरेटर ०१ रिक्त
5 शिपाई ०१ ०१

अभ्यासक्रम विकसन विभाग - संबंधित शासन निर्णय

क्र.नं. शिक्षकांची व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता बाबत शासन निर्णय दिनांक
1 शिक्षकांची व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता बाबत निश्चीत करणेबाबत शासन निर्णय दि. ०७ फेब्रुवारी, २०१९
2 शिक्षकांची व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता निश्चीत करणेबाबत शुद्धिपत्रक दि. २५ फेब्रुवारी, २०१९
3 शिक्षकांची व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता निश्चीत करणेबाबत शुद्धिपत्रक दि. १६ मे, २०१९
4 शिक्षकांची व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता निश्चीत करणेबाबत शुद्धिपत्रक दि. १२ जून, २०१९
5 शिक्षकांची व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता निश्चीत करणेबाबत शुद्धिपत्रक Pest Management दि. १२ मार्च, २०२४
विषययोजना व मूल्यमापन योजना
1 इयत्ता ९ वी व 10 वी विषययोजना व सुधारित मूल्यमापन योजना दि. ०८ ऑगस्ट, २०१९
2 इयत्ता 11 वी व 12 वी विषययोजना व सुधारित मूल्यमापन योजना दि. ०८ ऑगस्ट, २०१९
3 इयत्ता 11 वी व 12 वी विषययोजना व सुधारित मूल्यमापन योजना - ग्रुप B व ग्रुप C मधील बदलाबाबत दि. ११ नोव्हेंबर, २०१९
4 इयत्ता 11 वी व 12 वी विषययोजना व सुधारित मूल्यमापन योजना - काही विषयांसाठी सवलत देणेबाबत दि. १८ जानेवारी, २०२१
5 इयत्ता 11 वी व 12 वी विषययोजना व सुधारित मूल्यमापन योजना - सामान्य ज्ञान विषय समावेश दि. २० ऑक्टोबर, २०२१
6 इयत्ता 11 वी व 12 वी विषययोजना व सुधारित मूल्यमापन योजना - शिक्षणशास्त्र विषयाबाबत दि. २५ फेब्रुवारी, २०२२
7 अल्पसंख्यांक संस्थांमध्ये इंग्रजी प्रथम भाषा उपलब्ध करून देणेबाबत दि. २९ जून, २०२२
NEP टास्क बाबत
1 NEP टास्क अंमलबजावणीबाबत समिती गठीत करणेबाबत दि. २४ जून, २०२२
राज्यस्तरीय सुकाणू समिती
1 स्थापना दि. २४ मे, २०२३
2 सुधारणा दि. ०२ जानेवारी, २०२४

अभ्यासक्रम विकसन विभागाची कार्ये

  1. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती करणे.
  2. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील इयत्ता १ ली ते 12 वी चा अभ्यासक्रम अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करणे.
  3. नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचे वेळापत्रक निश्चित करणे.
  4. सुधारित अभ्यासक्रमानुसार तसेच नवीन ध्येय धोरणानुसार व बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार अध्ययन - अध्यापन प्रक्रिया, मूल्यमापन प्रक्रिया याबाबत शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
  5. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मार्गदर्शिका व घटकसंच विकसित करणे.
  6. विषययोजना ठरविणे, अभ्यासक्रमामध्ये नवीन विषय अथवा आशस समाविष्ट करणेबाबत शासनास अभिप्राय देणे.
  7. शालेय शिक्षण स्तरावरील विषय अध्यापनासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता ठरविणेबाबत शासनास अभिप्राय देणे.
  8. अभ्यासक्रम निर्मितीसाठी आवश्यक ती कार्यवाही (अभ्यासमंडळ स्थापना, अभ्यासमंडळ उद्बोधन कार्यशाळा, अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा इत्यादीचे आयोजन, शासनाशी पत्रव्यवहार करणे.)
  9. अभ्यासक्रम प्रशिक्षण सहित्य विकसन करणे.
  10. अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करणे.
  11. अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रमाचे अनुधावन करणे व निष्कर्षानुसार पुढील प्रशिक्षण कार्यक्रमात उपयुक्त बदल करणे.
  12. अभ्यासक्रमाबाबत पर्यवेक्षकीय यंत्रणेला माहिती देणे , त्यांचे उदबोधन करणे.
  13. अभ्यासक्रमाशी सुसंगत असणाऱ्या प्रकल्प प्रस्तावांचे परीक्षण करून प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता देणे.
  14. विविध खाजगी प्रकाशकांकडून विकसित केलेले शैक्षणिक साहित्य (छापील व ई स्वरूपात) यांचे परीक्षण करणे.
  15. शिक्षणातील नवविचार प्रवाहाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाचे पुनर्विलोकन करणे व आवश्यक तेथे अभ्यासक्रमाचे उच्चीकरण करणे तसेच त्याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना उद्बोधन करणे.

Initiatives/Affiliations