1. विभागाची स्थापना
प्रसारमाध्यम विभाग हा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे कार्यरत आहे. या विभागामध्ये श्रीम.अपर्णा शेंडकर, अधीक्षक, श्री. अरुण सांगोलकर, वरिष्ठ अधिव्याख्याता तथा विभाग प्रमुख आणि श्रीम. ज्योती शिंदे, उपसंचालक (आय.टी व प्रसारमाध्यम विभाग) हे अधिकारी कार्यरत आहेत. मा. डॉ. शोभा खंदारे, सहसंचालक आणि मा. श्री.राहूल रेखावार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी कामकाज सुरु आहे. पूर्वी विभागाचे नाव “जीवन शिक्षण” असे होते. शासन निर्णय, दिनांक १७ ऑक्टोबर, २०१६, एस.सी.ई.आर.टी. आणि डाएट पुनर्रचना, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई च्या संदर्भाने जीवन शिक्षण विभागाचे नाव प्रसारमाध्यम विभाग असे ठेवण्यात आले.
१९ व्या शतकात सुरु झालेले शिक्षक, पालक व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात मार्गदर्शक ठरणारे व शिक्षण आणि शिक्षणासाठीच वाहिलेले महाराष्ट्रातील पहिले मासिक म्हणजे “जीवन शिक्षण” शिक्षण क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे बघत आलेल्या या मासिकाचे जुने अंक जर आपण चाळले तर १९ व्या शतकापासून शिक्षण प्रत्येक महिन्यागणिक कसे बदलत गेले याची विस्तृत माहिती या अंकांच्या पानापानातून आपल्याला वाचायला मिळतो.
पुण्यातील विश्रामबाग वाड्यात पुणे कॉलेज नावाची शासकीय संस्था होती. या संस्थेतून मे १८६१ पासून पुना कॉलेज स्कूल पेपर म्हणजेच पुणे पाठशाला पत्रक हे २४ पृष्ठ संख्या असलेले २ रु किमतीचे मासिक सुरु झाले. पुना नॉर्मल स्कूलचे सुपरिटेन्डनट श्रीकृष्ण शास्त्री तळवेकर हे या पत्रिकेचे आद्य संपादक. पुढे १८६३ पासून केरो लक्षमण छत्रे या संपादकांनी मराठी शालापत्रक असे त्याचे नाव बदलले. त्यांच्या नंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर या कॉलेजचे प्राचार्य आणि मासिकाचे संपादक झाले. त्यांनी मासिकाचे स्वरूप बदलवून इंग्रजी, संस्कृत मधील विद्वत्तापूर्ण निबंध, विवेचन, छापण्यास सुरुवात केली पण मराठी लेखनास दिशा देणारे हे मासिक काही कारणास्तव १८७५ मध्ये बंद पडले. १८९० मध्ये रामचंद्र भिकाजी जोशी या संपादकांनी चित्रशाळा प्रेस मार्फत बरीच वर्ष हे मासिक चालविले. जुलै १९११ मध्ये ट्रेनिंग कॉलेजकडे हे मासिक सुपूर्द करण्यात आले. कालांतराने मराठी शिक्षक, कन्या शिक्षक असे पण त्याचे नामकरण करण्यात आले. एप्रिल १९२८ मध्येप्राथमिक शिक्षक हे नाव मासिकाला देण्यात आले. अंकाचे स्वरूपही आकर्षक होवून त्याला स्थैर्य मिळण्यास सुरुवात झाली.
१९५६ मध्ये महात्मा गांधीजीनच्या "जीवन शिक्षण" या विचारांपासून प्रेरणा घेवून “जीवन शिक्षण” नाव देण्यात आले आणि आजपर्यंत त्याच नावाने हे मासिक ओळखल्या जाते अनुताई वाघ इंदुमती शिरवाडकर ,एस एम जोशी,प्रा. बोकिले,प्रा वसंत देसाई, यदुनाथ थत्ते, यासारख्या दिग्गज लेखकांच्या लेखणीने पावन झालेल हे मासिक अजूनही प्रत्येक शिक्षकाला तेवढच हवेहवेसे वाटते. पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी व शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेसाठी राबवीत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांचे अनुभव या मासिकामध्ये शब्दबद्ध करून नियमित पाठवित असतात. शाळांमध्ये विद्यार्थी ज्या काही कृती करतात त्याचे क्षणचित्रे सुद्धा अंकात छापले जातात. सध्या हे मासिक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या कडून प्रकाशित केले जाते. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना मोफत वितरण केल्या जाते. वर्गणीदाराना आणि देणगीदारांना हा अंक पोस्टामार्फत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. जीवन शिक्षण मासिकाचा वर्षातून एकवेळा जोड विशेषांक काढला जातो.
2. विभागाची संरचना / पदसंरचना
प्रसारमाध्यम विभागाकरिता मंजूर पदांची माहिती:- (17 ऑक्टोबर 2016 च्या शासन निर्णयानुसार)
अ.क्र. | पदाचे नाव | मंजूर पदे | कार्यरत पदे | रिक्त पदे |
---|---|---|---|---|
१. | उपसंचालक | 01 | 01 | 0 |
२. | वरिष्ठ अधिव्याख्याता | 01 | 01 | 0 |
३. | अधिव्याख्याता | 01 | 0 | 01 |
४. | अधीक्षक | 01 | 01 | 0 |
५. | विषय सहायक | 01 | 0 | 01 |
६. | लिपिक/ डाटा एन्ट्री ऑपरेटर | 03 | 02 | 01 |
७. | कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएसआर च्या मदतीने | 01 | 0 | 01 |
८. | वर्ग ४ | 01 | 0 | 01 |
एकूण | 10 | 5 | 5 |
3. महत्त्वाचे शासन निर्णय
अ. क्र. | तपशील | शासन निर्णय |
---|---|---|
1 | प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: डायट ४५१६/(४०/१६) / प्रशिक्षण दिनांक : 17 ऑक्टोंबर, 2016 |
2 | ई-निविदा | उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक भांखस -2014/प्र.क्र.82/भाग-III/उद्योग-4 दि. 6 डिसेंबर , 2016 |
3 | जीवन शिक्षण माशिकाची वार्षिक वर्गणी वाढ करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-2018/प्र.क्र.125/प्रशिक्षण दिनांक :- 10 डिसेंबर 2018 |
4 | शैक्षणिक पुस्तके, साहित्य, ई-साहित्य, लघुचित्रपट, चित्रपट परीक्षण करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई क्र.संकीर्ण २०२० /प्र.क्र. २५ /प्रशिक्षण दि. ५ मार्च २०२० |
5 | शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक : राप्रधो 4215/(38/15)/प्रशिक्षण दिनांक 24 जुलै, 2017 |
4. विभागाची उद्दिष्ट्ये
5. विभागातील कामे / उपक्रम
चालणारे कामकाज :
कार्यक्रम आणि उपक्रम:
6. फोटोगॅलरी
सन २०२3-२4 मध्ये करण्यात आलेले विशेषांक
![]() |
![]() |
![]() |
समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय पुस्तके विकसन 2023-24
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |