विभागाचे नाव :- मूल्यमापन विभाग



स्थापना:
     सन १९६३ साली शिक्षण संचालनालयात मूल्यमापन विभागाची स्थापना झाली.सन १९६८ मध्ये हा विभाग परिषदेत समाविष्ट करण्यात आला.

विभागाचे उद्दिष्ट्ये :-
  • १) शाळांतर्गत शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेमधील समस्यांचा अभ्यास करून त्यात सुधारणा सुचविणे.
  • २) सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनासाठी साधनांची व मार्गदर्शक साहित्यांची निर्मिती करणे.
  • ३) शाळांतर्गत मुल्यमापनासाठी क्षमता/अध्यन निष्पत्ती/कौशल्य यांवर आधारित चाचण्यांची निर्मिती करणे.
  • ४) अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत गुणात्मकदृष्ट्या सुधारणा घडवून आणण्यासाठी मार्गदर्शक साहित्य निर्मिती करणे .
  • ५) नवीन अभ्यासक्रम क्षमताधिष्टीत अध्ययन - अध्यापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीबाबत राज्य, विभाग, जिल्हा पातळीवरील मार्गदर्शक यांच्यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे
  • ६) अध्ययन - अध्यापन प्रक्रिया व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याबाबत धोरण आखण्यासाठी किंवा योग्य दिशा देण्यासाठी विविध चाचण्याद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे.

विभागाची कार्ये :-
  • १) विषयनिहाय प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र चाचण्यांचे आयोजन करणे.
  • २) मागील वर्षापर्यंतची मुलभूत क्षमतामधील विद्यार्थी संपादणूक व यावर्षीची संपादणूक यांची तुलना करणे.अहवाल तयार करणे.
  • ३) विविध संपादणूक सर्वेक्षण अहवाल विषय विभागांशी,विविध संस्था,जिल्हे यांचेशी चर्चा करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे.(कारणे,उपाय योजना इत्यादी)
  • ४) नवनवीन मूल्यमापन तंत्रे पद्धती तसेच इतर राज्यांच्या पद्धती यांची माहिती घेणे,अभ्यास करणे.
  • ५) विषय विभागाने तयार केलेल्या अध्ययन निष्पत्तीचा सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यामापनाशी संबध जोडणे.
  • ६) वरील मुद्द्यांबाबत वापराचे शिक्षकांना प्रशिक्षण देणे.
  • ७) नोंदवही/ प्रगतीपत्रकात अध्ययन निष्पत्तीचा समावेश करणे. चेकलिस्ट तयार करणे.
  • ८) अध्ययन निष्पत्ती व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याच्या अंमलबजावणीचा वर्ष अखेर आढावा घेणे. अनुधावान करणे.
  • ९) विविध सर्वेक्षणाचे आयोजन करणे. (विद्यार्थी संपादणूकी बाबत)
  • १०) विविध संपादणूक सर्वेक्षण अहवाल विषय विभागांशी,विविध संस्था,जिल्हे यांचेशी चर्चा करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे.(कारणे,उपाय योजना इत्यादी)
  • ११) मूल्यमापन, तंत्रे, पद्धती यांच्या वापराबाबत शिक्षकांच्या अडचणी पाहून मागणीनुसार प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
  • १२) प्रगत शैक्षणिक चाचणीच्या आधारे विषय निहाय, क्षमता निहाय विद्यार्थी संपादणूक नोंदीची प्रणालीचा (APP) वापर करणे/प्रणाली मध्ये आवशक्तेनुसार बदल करणे.

विभागाची संरचना :-

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
उपविभाग प्रमुख
अधिव्याख्याता
विषय सहाय्यक
मूल्यमापन कक्ष प्रतिनिधी १६
लिपिक -
शिपाई -

वर्षभरात विभागाने राबविलेल्या सर्व उपक्रमाची (प्रशिक्षण/ कार्यशाळा) यादी.

अ.क्र. उपक्रमाचे नाव स्तर (इ. १ ली ते ५, ६ ते ८, ९ ते १०) आर्थिक सहाय्य (समग्र शिक्षा, शिक्षक प्रशिक्षण, राज्य निधी, विना अर्थ सहाय्य)
CCE प्रशिक्षण १ ली ते ८ वी STAR
HPC ९ ली ते १० वी STAR
PAT ३ री ते ८ वी STAR
SEAS सर्वेक्षण ३, ६, ८ या इयत्ता STAR
मूल्यमापन कक्ष निर्मिती STAR
ITEM bank निर्मिती ( शिक्षक पर्व अंतर्गत) ९ ली ते १० वी निरंक
परीक्षा पे चर्चा अंतर्गत विविध स्पर्धा ८ वी ते १० वी STAR

उपक्रमाचे नाव :- १) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) घटक संच विकसन व शिक्षक प्रशिक्षण
उपक्रमाची उद्दिष्ट्ये :-
  • उपक्रमाची उद्दिष्टे :-
  • राज्यातील तज्ज्ञ शिक्षकांचा कार्यबळ गट तयार करणे.
  • केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य तो बदल करणे.
  • राज्यासाठी केंद्राच्या सुचनेनुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती विकसित करणे.
  • राज्यस्तर तज्ज्ञांमार्फत विकसित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचे राज्यातील सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे.
  • विद्यार्थ्यांचे नियतकालिक व सातत्यपूर्ण मूल्यमापन करणे साठी शिक्षकांना सक्षम बनविणे.
उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप (मुद्देनिहाय माहिती द्यावी)
  • १) सदर उपक्रमांतर्गत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) घटक संच विकसन व बदल पूर्ण झाला.
  • २) त्यावर आधारित तालुका व जिल्हा स्तर प्रशिक्षण घेण्यात आले.
  • ३) कार्यशाळमध्ये नवीन शैक्षणिक धोरणनुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) घटक संचमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
उपक्रमाची सांख्यिकीय तपशील :-
अ.क्र. उपक्रमाचे नाव स्तर उपक्रमाचा कालावधी (कोहून...कोठपर्यंत) सहभागी घटक/ लाभार्थी सहभागी संख्या प्राप्त निधी खर्च निधी आर्थिक सहाय्य
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन (CCE) घटक संघ विकास व शिक्षक प्रशिक्षण प्राथमिक २०२३-२४ शिक्षक ३२९००० १९५४५.४६ STAR
उपक्रमाची फलनिष्पत्ती :-

बदलत्या परिस्थिती नुसार झालेले बदल शिक्षकांपर्यंत पोहचविण्यास सहाय्यभूत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) प्रशिक्षण अंदाजे ३२५००० लक्ष शिक्षकाना देण्यात आले आहे. ज्या आधारे शिक्षकाना मूल्यमापन करताना सुलभता प्राप्त होईल.

उपक्रमाचे फोटो :-

२) उपक्रमाचे नाव :- मा. पंतप्रधान महोदय यांचेसमवेत इयत्ता ६ वी ते 12 वी चे विद्यार्थ्यांशी परीक्षे पे चर्चा - 6 उपक्रमाची उद्दिष्टे :-
  1. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा असलेला ताणतणाव कमी करणे.
  2. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे.
उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप (मुद्देनिहाय माहिती द्यावी)

१. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे “परीक्षा पे चर्चा - ६” या कार्यक्रमांतर्गत इयत्ता ६ वी ते १२ वीच्या निवडक विद्यार्थ्यां (२०२) समवेत फेब्रुवारी २०२३ मध्ये संवाद साधला.

२. निवडक २०२ विद्यार्थ्यांना मा. संचालक NCERT, नवी दिल्ली यांचेमार्फत एक विशेष PPC किट देण्यात आले (हे यथायोग्य मा. पंतप्रधान महोदयांनी लिहिलेल्या हिंदी व इंग्रजी मधील परीक्षा चौकट पुस्तकासह समाविष्ट आहे ते प्रदान करण्यात आले).

उपक्रमाची सांख्यिकी तपशील :-

इयत्ता ९ वी ते १० वी सर्व विद्यार्थी

उपक्रमाची सांख्यिकी तपशील :-
अ.क्र. उपक्रमाचे नाव स्तर उपक्रमाचा कालावधी (कोहून..कोठेपर्यंत) सहभागी घटक/लाभार्थी सहभागी संख्या प्राप्त निधी खर्च निधी आर्थिक सहाय्य
मा. पंतप्रधान महोदय यांचेसमवेत इयत्ता ६ वी ते १२ वी चे विद्यार्थी परीक्षा पे चर्चा - ६ उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक २०२३-२४ शिक्षक २०२ STAR
उपक्रमाची फलनिष्पत्ती :-

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठासमोर आपल्या अडचणी मांडण्याचा आला.

उपक्रमाचे फोटो :-

३) उपक्रमाचे नाव :- राज्यस्तरीय शैक्षणिक संपादूनक सर्वेक्षण (SEAS) परख :- उपक्रमाची उद्दिष्टे :-
  • इयत्ता ३ री, ६ वी, व ९ वी मधील विद्यार्थ्यांची मराठी व गणित या विषयातील मुलभूत अध्ययन क्षमता संपादूनक पातळी तपासणे.
  • अध्ययनातील कठीण क्षेत्रांचा शोध घेणे.
  • लिंग, ग्रामीण व शहरी, सामाजिक गट यानुसार विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादूनकीतील फरक पाहणे.
  • सर्वेक्षण निष्कर्षानुसार आवश्यक क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय योजना सुचविणे.
  • पुढील वर्षाच्या संपादूनकीचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तसेच वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सर्वेक्षण निष्कर्षांचा वापर करणे.
  • राज्यस्तरीय अध्ययन संपादूनक सर्वेक्षण आधारेच उद्गीर इयत्तांसाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित राज्यस्तरीय शैक्षणिक संपादूनक सर्वेक्षण (SEAS) चे आयोजन करणे.
उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप (मुद्देनिहाय माहिती द्यावी)
  1. प्रश्न निर्मिती
  2. निष्कर्षानुसार प्रश्न निवड
  3. विद्यार्थी प्रश्नावली, OMR sheet विकास यांद्वारे विद्यार्थ्यांची मुलभूत अध्ययन क्षमता संपादूनक पातळी तपासणे.
उपक्रमाची सांख्यिकी तपशील : इयत्ता ३ री, ६ वी, व ९ वी मधील विद्यार्थी (५७६६१३)
अ.क्र. उपक्रमाचे नाव स्तर उपक्रमाचा कालावधी (कोणताही ठप्पेत) सहभागी घटक/लाभार्थी सहभागी संख्या प्राप्त निधी खर्च निधी आर्थिक सहाय्य
राज्यस्तरीय शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) परख उच्च प्राथमिक माध्यमिक २०२३-२४ शिक्षक ५७६६१३ १९६२१०७६६६ ६६६४३४१८८ STAR

उपक्रमाची फलनिष्पत्ती :- राज्याच्या संपादणूकतेचे चित्र स्पष्ट होईल व त्यावर आधारित पुढील कार्ययोजना आखता येतील.

उपक्रमाचे फोटो :-

४) उपक्रमाचे नाव :- समग्र प्रगती पुस्तक (HPC) उपक्रमाची उद्दिष्टे :-
  • १. समग्र प्रगती पत्रक (HolisticProgressCard) चा मसुदा तयार करणे.
  • २. विद्यार्थ्यांचे समग्र मूल्यमापन करण्यासाठी NEP च्या निर्देशानुसार व NCERT च्या सूचनेनुसार समग्र प्रगती पत्रक (HolisticProgressCard) इयत्ता बालवाडी ते ५ वी पर्यंत तयार करणे

उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप (मुद्देनिहाय माहिती द्यावी)

  • १. समग्र शिक्षाअंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी PAB मध्ये इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठीसमग्र प्रगती पत्रक (HolisticProgressCard) तयार करण्यासाठी मान्यता मिळाली आहे
  • २. NCERT नवी दिल्ली यांचे कडून प्राप्त निर्देशानुसार समग्र प्रगती पत्रक ( HolisticProgressCard ) तयार करावे व त्याआधारे ५० शाळांमध्ये पथदर्शी अभ्यास करण्यात यावा व त्याचा अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले होते त्या नुसार कार्यवाही करण्यात आले.
  • ३. पायाभूत स्तराचे HPC तयार करणेबाबत तीन कार्यशाळा घेण्यात आल्या.
उपक्रमाची सांख्यिकी तपशील : इयत्ता ३ री, ६ वी, व ९ वी मधील विद्यार्थी (५७६१३)
अ.क्र. उपक्रमाचे नाव स्तर उपक्रमाचा कालावधी (कोणत.को ठप्पे) सहभागी घटक/ लाभार्थी सहभागी संख्या प्राप्त निधी खर्च निधी आर्थिक सहाय्य
समग्र प्रगती पुस्तक (HPC) पायाभूत व पूर्वतयारी २०२३-२४ विद्यार्थी ६२ १२१ STAR
उपक्रमाची फलनिष्पत्ती :-

समग्र प्रगती पत्रक तयार करण्यात व वापरण्यात येणाऱ्या अडचणी समजण्यास मदत झाली.

५ उपक्रमाचे नाव :- ITEM bank निर्मिती ( शिक्षक पर्व अंतर्गत) उपक्रमाची उद्दिष्टे :-
  • राज्य व राष्ट्रीय संपादपूक सर्वेक्षणात सरासरी संपादपूक वाढविण्यासाठी आवश्यक त्या स्वरूपातील प्रश्न रचना कशी करायची याबाबत मार्गदर्शन करणे.
  • NAS/SLAS या सारख्या प्रश्न तयार करून घेणे व ते सर्व शिक्षकान पर्यंत पोहचविणे.
उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप (मुद्देनिहाय माहिती द्यावी)

NCERT च्या निर्देशानुसार सर्व शरातील शिक्षकांकडून प्रश्न तयार करून घेऊन ते पोर्टल वरती अपलोड करून घेण्यात आले आहेत.

उपक्रमाची सांख्यिकीय तपशील :-
अ.क्र. उपक्रमाचे नाव स्तर उपक्रमाचा कालावधी (कोणून..कोण ठप्पंती) सहभागी घटक/लाभार्थी सहभागी संख्या प्राप्त निधी खर्च निधी आर्थिक सहाय्य
ITEM bank निर्मिती ( शिक्षक पर्व अंतर्गत) प्राथमिक ते उच्च माध्यमिक २०२३-२४ शिक्षक / सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक व विद्यार्थी - STAR

उपक्रमाची फलनिष्पत्ती - राज्यातील शिक्षकांना प्रश्ननिर्मिती करण्यात सुलभता निर्माण होण्यास मदत झाली व त्या अनुभवाने कार्यवाही होण्यास मदत झाली

६) उपक्रमाचे नाव – नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) उपक्रमाची उद्दिष्टे :-
  • १. विद्यार्थ्यी गुणवत्ता पडताळणी करणे.
  • २. शैक्षणिक आरोग्य स्थिती समजून घेणे.
  • ३. अध्ययन प्रक्रियीस चालना देणे.
उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप (मुद्देनिहाय माहिती घ्यावी)
  • इयत्ता : तिसरी ते आठवी
  • शाळा : शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा व अनुदानित शाळा
  • चाचणीचे विषय : प्रथम भाषा (१० माध्यम) , गणित (१० माध्यम) , तृतीय भाषा इंग्रजी
चाचणीचा अभ्यासक्रम:
  1. नियतकालिक मूल्यांकन चाचणी १ : मूलभूत क्षमता / कौशल्य यावर आधारित तसेच मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित. (पायाभूत चाचणी)
  2. नियतकालिक मूल्यांकन चाचणी २ : मूलभूत क्षमता / कौशल्य यावर आधारित तसेच अध्ययन निष्पत्ती व अभ्यासक्रम यांची सांगड घालून प्रथम सत्रातील अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने तयार करण्यात यावी.
  3. नियतकालिक मूल्यांकन चाचणी ३ : मुलभूत क्षमता / कौशल्य यावर आधारित तसेच द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित.
चाचणीचा कालावधी :
  • १. नियतकालिक मूल्यांकन चाचणी १ : १७ ते १९ ऑगस्ट २०२३
  • २. नियतकालिक मूल्यांकन चाचणी २ : ३० ऑक्टोबर २०२३ ते ०९ नोव्हेंबर २०२३
  • ३. नियतकालिक मूल्यांकन चाचणी ३ : एप्रिल २०२४ पहिला / दुसरा आठवडा.
उपक्रमाची सांख्यिकी तपशील :-
अ.क्र. उपक्रमाचे नाव स्तर उपक्रमाचा कालावधी (कोठून..कोठपर्यंत) सहभागी घटक/लाभार्थी सहभागी संख्या प्राप्त निधी खर्च निधी आर्थिक सहाय्य
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) प्राथमिक ते उच्च प्राथमिक २०२३-२४ शिक्षक / सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक व विद्यार्थी ५५३७७.१८ STAR
उपक्रमाची फलनिष्पत्ती :-
  • १.) विद्यार्थी संपादणूकता समजण्यास मदत झाली.
  • २.) विद्यार्थी निहाय माहिती राज्यस्तरावर संकलित करण्यात आली यामुळे राज्यस्तरावर पुढील नियोजन करण्यास दिशा मिळाली.
  • ३.) NAS, SLAS तयारीच्या दृष्टीने मदत झाली.
उपक्रमाचे फोटो :

७) उपक्रमाचे नाव :- मूल्यांकन कक्ष निर्मिती

मूल्यांकन कक्ष स्तर प्रकल्प अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे राज्य मूल्यांकन कक्ष स्थापन करणे बाबत २४ एप्रिल २०२३ नुसार मान्यता देण्यात आलेली आहे. या अंतर्गत ५० लक्ष रुपये निधी मंजूर झालेला असून या अंतर्गत मूल्यांकन कक्ष स्थापन करण्याचे काम करण्यात येणार आहे.

उपक्रमाची उद्दिष्टे :-
  • १. मूल्यांकन यंत्रणांचे सबलीकरण करणे
  • २. मूल्यांकन करण्याकरीता राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा तयार करणे.
  • ३. मूल्यांकन प्रक्रिया सुधारणा करणे व ती बळकट करणे.
उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप (मुद्देनिहाय माहिती द्यावी)
  • १. सन २०२३ २४ एप्रिल शैक्षणिक वर्षामध्ये स्तर प्रकल्पांतर्गत राज्यांमध्ये मूल्यांकन कक्ष स्थापन करण्यात आला असून यामध्ये मराठी विषयाचे व गणित विषयाचा एक या पद्धतीने विषय तर हजर झालेले आहेत.
  • २. इतर विषय हळू हळू हजर होणार आहेत. तसेच बायब कंटाळी धारे दोन पदे भरण्यात आली होती.
उपक्रमाची सांख्यिकी तपशील :-
अ.
क्र.
उपक्रमाचे नाव स्तर उपक्रमाचा कालावधी (कोठून..कोठे
पर्यंत)
सहभागी घटक/
लाभार्थी
सहभागी संख्या प्राप्त निधी खर्च निधी आर्थिक सहाय्य
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) प्राथमिक ते उच्च प्राथमिक २०२३-२४ शिक्षक / सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक व विद्यार्थी ५३३७.१८ STAR
उपक्रमाची फलनिष्पत्ती :-
  • १. मूल्यांकन प्रक्रिया संदर्भातील कामकाज करण्यास सुलभता निर्माण झाल
६) उपक्रमाचे नाव :- इयत्ता पाचवी आठवी परीक्षा उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप (मुद्देनिहाय माहिती द्यावी)

इयत्ता पाचवी व आठवी या वर्गांकरिता सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीने वार्षिक परीक्षा घेणे संदर्भातील शासन निर्णय तयार करणे व त्यानुसार राज्यस्तरावर अंमलबजावणी करणे.

उद्दिष्टे

  • १. इयत्ता पाचवी वार्षिक परीक्षेचे स्वरूप निश्चित करणे.
  • २. मूल्यमापन पद्धतीत सुधारणा करणे.
उपक्रमाची सांक्षिकी तफशील :-
अ.क्र. उपक्रमाचे नाव स्तर उपक्रमाचा कालावधी (कोणत्या...कोठपर्यंत) सहभागी घटक/लाभार्थी सहभागी संख्या प्राप्त निधी खर्च निधी आर्थिक सहाय्य
पाचवी आठवी परीक्षा प्राथमिक ते उच्च प्राथमिक २०२३-२४ शिक्षक / सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक व विद्यार्थी STAR
उपक्रमाची फलनिष्पत्ती :-
  • १) सन २०२३ - २४ पासून इयत्ता पाचवी आठवी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली.
  • २) विद्यार्थी मूल्यमापनामध्ये बदल करण्यात आले.
अनु.क्र. इयत्ता डाउनलोड
1. इयत्ता - ३ री Download Download
2. इयत्ता - ४ थी Download Download
3. इयत्ता - ५ वी Download Download
4. इयत्ता - ६ वी Download Download
5. इयत्ता - ७ वी Download Download
6. इयत्ता - ८ वी Download Download

Initiatives/Affiliations