उर्दू भाषा विभाग (सन २०२३-२४)
विभागाची स्थापना :-
शासन निर्णय दि. १७ ऑक्टोबर २०१६ नुसार राज्य शैक्षाणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत सर्व विभागांची पुनर्रचना करण्यात आली व त्यानुसार भाषा विभाग अंतर्गत उर्दू भाषा विभाग सुरु करण्यात आला.
विभागाची पदसंरचना :-
| अ.क्र. | पदाचे नाव | मंजूर पदे | कार्यरत पदे | रिक्त पदे |
|---|---|---|---|---|
| १. | उपसंचालक/प्राचार्य भाषा | ० | ० | ० |
| २. | वरिष्ठ अधिव्याख्याता | ०१ | ०१ | ० |
| ३. | अधिव्याख्याता | ०२ | ०१ | ०१ |
| ४. | विषय सहायक | ०३ | ० | ०३ |
| ५. | लिपिक डेटा / एंट्री ऑपरेटर | ० | ० | ० |
| ६. | कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएसआर च्या मदतीने | ०१ | ० | ०१ |
| एकूण | ०७ | ०२ | ०५ |
विभागाची उद्दिष्टे व कार्ये :-
-
➢ उर्दू माध्यमातील विद्यार्थी आणि इयत्ता 1 ते 12 च्या शिक्षकांसाठी वेगवेगळे TLM तयार करणे.
➢ पर्यवेक्षकीय अधिकारी,शिक्षक इत्यादींसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी, आयोजन आणि अंमलबजावणी करणे.
➢ विविध प्रशिक्षण, उपक्रम, साहित्य यांची परिणामकारकता पाहणे आणि सर्व भागधारकांना अभिप्राय देणे.
➢ उर्दू ई-साहित्य (व्हिडिओ, संदर्भ, सामग्री इ.) तयार करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देणे.
➢ उर्दू भाषेच्या अभ्यासात विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम राबविणे.
➢ इतर विभागांनी तयार केलेले साहित्य उर्दू भाषेत अनुवादित करणे व शाळांना पुरविणे.
➢ नवीन शक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी उर्दू भाषा विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम,पाठ्यक्रम निर्मिती करणे.
➢ पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मोहिमेच्या अनुषंगाने शिक्षकांची क्षमता वृद्धी करण्यासाठी सहाय्य करणे.
➢ इयत्ता 1 ते 12 वी पर्यंतच्या उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कृती कार्यक्रम आणि अध्ययन- अध्यापन सामग्रीचे विकसन आणि अंमलबजावणी करणे.
➢ प्रशिक्षणाच्या आवश्यकतेनुसार तज्ज्ञ मंडळीशी समन्वय साधणे.
➢ राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उर्दू भाषेचे अध्ययन परिणामकारक व्हावे या उद्देशाने विविध योजना व कृती कार्यक्रमांची आखणी करणे.
➢ प्रशिक्षण साहित्य विकसन करणे, यासाठी अभ्यासगट निश्चित करणे.
➢ राज्यातील उर्दू विषय अध्ययन-अध्यापन विषयक सद्य स्थितीचा आढावा घेऊन प्रशिक्षण विषयक गरजांची निश्चिती करणे व गरजाभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची योजना करणे व त्यांची अंमलबजावणी करणे.
➢ राज्यातील उर्दू भाषेच्या अध्ययन अध्यापनाची पातळी उंचावण्यासाठी सहायभूत असणाऱ्या विविध प्रकारच्या अध्ययन पूरक साहित्याचे विकसन करून ते राज्यातील विद्यार्थी व इतर सर्व घटकांना उपलब्ध करून देणे, यासाठी योजना तयार करणे.
➢ उपक्रमांची अंमलबजावणी सुरु असताना सर्व स्तरावर भेटी देणे (विभाग, जिल्हा, तालुका, शाळा, इ.)
➢ PAT अंतर्गत पायाभूत व संकलित चाचण्या तयार करून घेणे व गणित विषयासाठी भाषांतर करून देणे.इ.
➢ उर्दू शिक्षकांचे सक्षमीकरण करणे.
उपक्रमांची यादी :-
| अ.क्र. | वर्ष | उपक्रमाचे नाव |
|---|---|---|
| १ | २०१७-१८ | राज्यातील उर्दू माध्यमाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आठ जिल्ह्यांचा अभ्यास दौरा |
| पुढील पाच वर्षाचे कृती कार्यक्रम | ||
| उर्दू ई-साहित्य निर्मिती | ||
| २ | २०१८-१९ | उर्दू ई-साहित्य निर्मिती |
| मुलभूत वाचन अभियान साठी अध्ययन समृद्धी साहित्य संच | ||
| उर्दू मध्याम्तील शाळांसाठी नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा साठी साहित्य भाषांतर | ||
| ३ | सन २०१९-२०२० | उर्दू मुलभूत वाचन विकास कार्यक्रम शिक्षक प्रशिक्षण |
| उर्दू मुलभूत गणित विकास कार्यक्रम अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण | ||
| ४ | सन २०२१-२०२२ | निपुण भारत अंतर्गत FLN वर आधारित इयत्ता पहिली ते पाचवीसाठी विद्यार्थी कृती पुस्तिका (भाषा ) उर्दू सिखे ..ख़ुशी ख़ुशी |
| *विद्या प्रवेश- विद्यार्थी कृती पुस्तिका व शिक्षक मार्गदर्शिका*)( *इयत्ता पहिली*) | ||
| निपुण भारत अंतर्गत FLN वर आधारित इयत्ता पहिली ते पाचवीसाठी विद्यार्थी कृती पुस्तिका(गणित ) आओ रियाजी से दोस्ती करे | ||
| इयत्ता 1ली ते 5 वी विद्यार्थ्यासाठी FLN अंतर्गत कार्यपुस्तिका विकसन | ||
| गोष्टीचा शनिवार (इयत्ता 1 ते 8): | ||
| अभ्यासमाला (दैनिक अभ्यास मालिका) (इयत्ता 1 ते 10) प्रश्नपेढी विकसन (इयत्ता 10 आणि 12) | ||
| 100 दिवस वाचन मोहीम | ||
| इयत्ता २ री ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यास निर्मिती | ||
| ५ | सन २०२१-२०२२ | निपुण भारत सर्वेक्षण साहित्य विकसन |
| इयत्ता ६ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी कार्य पुस्तिकाचे विकसन | ||
| भाषिक कोडे आणि भाषिक खेळ पुस्तिका विकसन | ||
| सन २०२३-२०२४ | सेतू अभ्यास इयत्ता दुसरी ते दहावी उर्दू माध्यम | |
| भाषिक खेळ इयत्ता पहिली ते पाचवी शिक्षक हस्तपुस्तिका | ||
| उर्दू भाषा स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका इयत्ता पाचवी व आठवी | ||
| विद्याप्रवेश उर्दू | ||
| इयत्ता १० व १२ वी पुरवणी परीक्षा अध्ययन साहित्य विकसन | ||
| शैक्षणिक दिनदर्शिका (प्रथम भाषा उर्दू) | ||
| नियतकालिक मूल्यांकन चाचणी ( PAT ) प्रश्नपत्रिकांची निर्मिती उर्दू माध्यम | ||
| ६ | सन २०२४-२५ | निपुण भारत अभियानांतर्गत शिक्षकांसाठी FLN हस्तपुस्तिका विकसन |
| उर्दू शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम २.० | ||
| उर्दू शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम २.० प्रशिक्षण घटकसंच व वाचनसाहित्य विकसन | ||
| नियतकालिक मूल्यांकन चाचणी ( PAT ) प्रश्नपत्रिकांची निर्मिती उर्दू माध्यम |
शैक्षणिक साहित्य वर्षांनिहाय :-
| अ.क्र. | वर्ष | उपक्रमाचे नाव |
|---|---|---|
| १ | सन २०१९-२०२० | उर्दू मुलभूत वाचन विकास कार्यक्रम शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शिका |
| उर्दू मुलभूत गणित विकास कार्यक्रम अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शिका | ||
| २ | सन २०२१-२०२२ | निपुण भारत अंतर्गत FLN वर आधारित इयत्ता पहिली ते पाचवीसाठी विद्यार्थी कृती पुस्तिका (भाषा ) उर्दू सिखे ........ख़ुशी ख़ुशी |
| *विद्या प्रवेश- विद्यार्थी कृती पुस्तिका व शिक्षक मार्गदर्शिका* ( *इयत्ता पहिली*) | ||
| निपुण भारत अंतर्गत FLN वर आधारित इयत्ता पहिली ते पाचवीसाठी विद्यार्थी कृती पुस्तिका(गणित ) आओ रियाजी से दोस्ती करे | ||
| ३ | सन २०२३-२०२४ | सेतू अभ्यास इयत्ता दुसरी ते दहावी उर्दू माध्यम |
| भाषिक खेळ इयत्ता पहिली ते पाचवी शिक्षक हस्तपुस्तिका | ||
| उर्दू भाषा स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका इयत्ता पाचवी व आठवी | ||
| ४ | सन २०२४-२५ | उर्दू शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम २.० प्रशिक्षण घटकसंच व वाचनसाहित्य |
| निपुण भारत अभियानांतर्गत शिक्षकांसाठी FLN हस्तपुस्तिका |
उर्दू विभागाची संदर्भसाहित्य :-
| उपक्रमाचे नाव | लिंक |
|---|---|
| Urdu FLN Teachers Handbook (March 2025) | Open |
| URDU Bhashik Khel | Open |
| URDU Shikshak Prashikshan Margdarshika | Open |
फोटो गॅलरी :-
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |

















