बालशिक्षण विभाग:
शासन निर्णय १७ ऑक्टोबर, २०१६ नुसार शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे या संस्थेची पुनर्रचना होऊन परिषदेमध्ये 'बालशिक्षण विभाग' स्थापन झाला. सदर विभागासाठी एक उपसंचालक, एक वर्ग-एक अधिकारी, एक वर्ग-दोन अधिकारी, एक विषय सहायक आणि एक शिपाई अशा पदांची निर्मिती करण्यात आली.
बालशिक्षण विभागाची उद्दिष्टे
- राज्याच्या गरजा लक्षात घेऊन, राष्ट्रीय स्तरावरून निश्चित केल्या गेलेल्या पायाभूत स्तराच्या अभ्यासक्रमानुसार आराखडा निश्चित करणे
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालशिक्षणासंदर्भात दिलेली उद्दिष्टे पूर्ण करणे
- 'स्टार' प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण घटक संच तयार करणे.
- NEP-२०२० नुसार, पूर्वप्राथमिक शिक्षणांतर्गत बालकांची शाळापूर्व तयारी करणे.
- अंगणवाडी सेविकांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बालशिक्षणाच्या दृष्टीने सक्षमीकरण करणे.
- राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेल्या वयोगटातील सर्व बालकांचा शारीरिक, मानसिक व भावनिक, सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने,राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरून कार्यक्रम आखणे व त्याची अंमलबजावणी करणे.
विभाग रचना
संचालक
सहसंचालक
उपसंचालक / विभागप्रमुख
उपविभागप्रमुख /
अधिव्याख्याता
विषय सहाय्यक
अधिकारी कर्मचारी माहिती:
पदाचे नाव |
मंजूर पदे |
कार्यरत पदे |
उपसंचालक |
१ |
१ |
गट - अ |
१ |
१ |
गट - ब |
२ |
१ |
गट - ब (अधीक्षक ) |
९ |
|
लिपिक/Data Entry Oper |
२ |
|
गट - क विषय सहाय्यक |
० |
१ |
CSR च्या मदतीने शासनाबाहेरील |
० |
|
गट - ४ शिपाई |
१ |
१ |
विभागामार्फत सुरु असलेले उपक्रम
सन २०२४ - २०२५
- आनंदी बालशिक्षण
- शाळापूर्व तयारी
- राज्य अभ्यासक्रम आराखडा : पायाभूत स्तर
- अंगणवाडी सेविका प्रमाणपत्र कोर्स (६ महिने)
- अंगणवाडी सेविकांसाठी हस्तपुस्तिका विकसन
- अंगणवाडी सेविका पदविका कोर्स (१ वर्ष)
पदनिहाय कार्यविवरण
१. उपसंचालक (विभागप्रमुख) यांचे कार्यविवरण
१. प्रत्येक उपविभागाचे ध्येय व उद्दिष्टये, राज्याच्या के. आर.ए. नुसार निश्चित करण्यास व संबंधित वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करण्यास मार्गदर्शन करणे. विभागाचा आढावा घेणे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तेच्या परिभाषेचा अभ्यास करुन शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी बेंचमार्क निश्चित करणे व हया वार्षिक कार्ययोजनेमध्ये त्यांचा समावेश असण्याची दक्षता घेणे.
शाळापूर्व तयारी
२. उपविभागांशी संबंधित सर्व प्रशिक्षण कार्यशाळा, बैठका यांचे नियोजन, अंमलबजावणी व समन्वय योग्य पध्दतीने होत असण्याची दक्षता घेणे, प्रत्येक प्रशिक्षण व कार्यशाळेसाठी गरजा निश्चिती, परिणामकारकता पडताळणी (impact analysis) गुणवत्ता व इतर आवश्यक घटक असण्याची खात्री करणे
३. प्रत्येक कार्यक्रमासाठी अद्ययावत साधन सामग्री (कोर्स मटेरिअल) उत्कृष्ट दर्जाचे असणे आवश्यक, योग्यस्थळ निवड प्रत्येक विभाग / उपविभागाने करुन घेतल्याची खात्री करणे व गरजेनुसार स्वतः सहभागघेणे
४. प्रशिक्षणाच्या आवश्यकतेनुसार केंद्र शासनाच्या बाहय किंवा इतर तज्ज्ञ मंडळींशी समन्वय साधणे
५. प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर अपेक्षित बदल घडत असल्याची खात्री करण्याच्या उद्देशाने शाळाभेट व वर्गभेट करणे. त्या ठिकाणी शिक्षकांना येणा-या अडचणींबाबत मार्गदर्शन करणे किंवा योग्य व्यक्तींना याबाबत सूचित करणे
६. शासन निर्णयानुसार निधी उपलब्ध नसल्यास Non-Budget Program ची प्रभावी अंमलबजावणी करणे
७. विभागाच्या सर्व प्रशिक्षण व शाळा सर्वेक्षण, शिक्षण परिषद, चर्चासत्र, कार्यशाळा व इतर कार्यक्रमांच्या गरजेनुसार, आवश्यकतेप्रमाणे योग्य भागीदार स्वयंसेवी संस्था / सी.एस.आर. मधून निवडणे व मान्यतेसाठी गाभा समितीसमोर प्रस्ताव सादर करणे
८. NEP टास्क विहीत मुदतीत पूर्ण होण्यासाठी विभागास मार्गदर्शन करणे
९. विभागांतर्गत उपलब्ध मनुष्यबळाच्या क्षमतेनुसार उपविभागातील कामकाजाचे सनियंत्रण करुन वेळेत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करणे
१०. सर्व कार्यक्रमांचे प्रस्ताव, टिपणी शासनाच्या नियमानुसार प्रशासकीय व आर्थिक मंजुरीसाठी मा. सहसंचालक, मा. संचालक यांना सादर करणे व विभागांतर्गत विषयाच्या शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणे आणि आवश्यकतेनुसार मा. संचालक यांच्या मान्यतेने शासनाला त्याबाबत अभिप्राय देणे / तार्किक सल्ला देणे
११. शासनास व विधान भवनास हवी असणारी माहिती पुरविणे
१२. विभागाचा प्रशासकीय अधिकारी म्हणून नियंत्रण करणे
१३. वर्ग १ व वर्ग २ अधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदन करणे
१४. वरिष्ठांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय पातळीवर NIEPA, NCERT, NCTE यांच्या बैठक, प्रशिक्षण, विविध कार्यशाळांना उपस्थित राहून त्याचा अहवाल सादर करणे
१५. संस्थेच्या वार्षिक कामकाजाचे फलनिष्पत्ती अहवाल तयार करणे
१६. प्रशिक्षणाचा प्रत्येक टप्पा नियोजनानुसार होत असण्याची दक्षता घेणे व सर्व कार्यक्रम दर्जेदार व प्रभावीपणे पार पडण्यासठी सनियंत्रण करणे,br
१७. कार्यक्रमांमध्ये आवश्यकता असल्यास स्वतः सत्रांची तयारी करणे व सत्र घेणे
१८. विभागास येणा-या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र, अखर्चित रक्कम तसेच खर्च ताळमेळ यांचे सनियंत्रण करणे
१९. नियोजित शैक्षणिक कामकाजाचे धोरणात्मक निर्णयानुसार अंमलबजावणी करणे
२०. कार्यालांतर्गत विभागाशी समन्वय ठेवणे. आवश्यक तेंव्हा मदत घेणे व मदत करणे
२१. सर्व उप विभागांमधील अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षण गरजा निश्चित करणे व कार्यालयाच्या वातावरणात वेळोवेळी त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी व त्यांच्या कामाच्या दर्जात निश्चित उच्चीकरण होईल अशा संधी निर्माण करणे व हया कार्यक्रमांच्या परिणामकारकतेची नोंद ठेवणे
२. उपविभागप्रमुख (वरिष्ठ अधिव्याख्याता) यांचे कार्यविवरण
१. राज्य प्रशिक्षण घोरणांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षणाच्या पध्दती (Online, Blended etc.) कालावधी निश्चित करुन वरिष्ट्रांच्या मार्गदर्शनानुसार योग्य निर्णय घेणे,
२. राज्यस्तरीय कार्यशाळांचे आयोजन, गरजानुसार प्रशिक्षण नियंत्रण प्रशिक्षण सहभाग व मार्गदर्शन करणे,
३. प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर अपेक्षित परिणाम घडत असल्याची खात्री करण्याच्या उद्देशाने राज्यातील विविध अधिकारी, कार्यालय व प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन मार्गदर्शन करणे,
४. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राज्यस्तरावर पेपर सादरीकरण कार्यशाळा परिषदांतून सहभाग घेणे,
५. NCERT, NIEPA, NCTE इ. कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणा-या चर्चासत्र, बैठका, प्रशिक्षण यामध्ये सहभाग घेणे,
६. NEP टास्क विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी संनियंत्रण करणे,
७. विभागाच्या प्रशिक्षणाच्या गरजेनुसार बेंचमार्क निश्चित करणे
८. वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करणे, कार्ययोजनेमध्ये परिणामकारकता बाबतचे माहिती संकलन व विश्लेषणाचे नियोजन समाविष्ट करणे,
९. प्रशिक्षणांची व इतर कार्यक्रमांची वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करुन दर्जेदार आणि प्रभावी प्रशिक्षण होण्यासाठी पुढाकार घेणे व त्याची परिणामकारकता तपासण्याबाबतचे नियोजन करणे.
१०. प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक तो उत्कृष्ट दर्जाचे अद्ययावत साधन सामग्री (कोर्स मटेरिअल) तयार करणे, योग्य स्थळ निश्चित करणे व आवश्यकतेनुसार तज्ज्ञ मंडळींशी समन्वय साधणे.
११. विभागांतर्गत उपलब्ध मनुष्यबळाच्या क्षमतेनुसार विभागातील कामकाजाची विभागणी करणे तसेच दैनंदिन पत्रव्यवहाराचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही बाबत सूचना देणे.
१२. विभागातील विषयाच्या संदर्भात कार्यशाळा, बैठका, प्रशिक्षण कार्यक्रम, पत्रव्यवहाराबाबत अभिप्राय लिहून वरिष्ठांना सादर करणे,
१३. वर्ग ३ अधिकारी / कर्मचारी याचे गोपनीय अहवालाचे पुनर्विलोकन करणे.
१४. प्रशिक्षणाशी संबंधित व आर्थिक बाबींशी निगडीत सर्व शासन निर्णय संकलित करुन ठेवणे.
१५. लेखा परिक्षणावेळी विभागातील आर्थिक अभिलेखे आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देणे.
१६. विभागांतर्गत मान्य वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकानुसार कार्यक्रमांची काळजीपूर्वक अंमलबजावणी करणे.
१७. राज्यात होणा-या शिक्षण परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण व कार्यक्रम इ. हे गरजाधारीत होण्यासाठी संबंधित विभाग आणि अधिकारी यांना सहकार्य करणे.
१८. राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणा (TOT) नंतर प्रशिक्षणाची परिणामकारकता मोजण्यासाठी निकष निश्चित करणे आणि त्यानुसार कार्यवाहीचे वाटप आणि अंमलबजावणी करणे.
१९. विभागाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे, विधानसभा कामकाज, विधान परिषद कामकाज, चौकशी प्रकरणे यासंबंधी कार्यवाही करणे.
२०. स्टार्स प्रकल्प अंतर्गत अनुदान मागणी करणे आणि त्यानुसार योग्य ती कार्यवाही करणे.
२१. शासन नियमानुसार निधीची मागणी करुन विभागाला प्राप्त निधी निकषानुसार वितरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे.
२२. विभागास येणा-या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र, अखर्चित रक्कम तसेच खर्चाचे ताळमेळ यांचे सनियंत्रण करणे. विभागामार्फत होणा-या प्रशिक्षणाच्या आर्थिक खर्चाची वेळेत पूर्तता करणे.
२३. संचालक, सहसंचालक व विभाग प्रमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार कार्यालयीन कामकाजाचे दैनंदिन व साप्ताहिक प्राधान्यक्रम देऊन सनियंत्रण करणे.
२४. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील इतर विभाग, क्षेत्रिय कार्यालय, सामाजिक संस्था, बाहय संस्था व शासन स्तरावर संपर्क ठेवणे.
२५. राज्यात होणा-या शिक्षण परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण व कार्यक्रम इ. हे गरजाधारित होण्यासाठी संबंधित विभाग आणि अधिकारी यांना सहयोग देणे.
3. अधिव्याख्याता यांचे कार्यविवरण
१. विविध प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ सुलभकांची / प्रशिक्षकांची निवड उपसंचालक व उपविभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करणे
२. प्रशिक्षण घटक संच निर्मिती, प्रत्यक्ष कार्यवाही व परिणामकारकता तपासणी इत्यादींचे नियोजन करणे
३. राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत विविध प्रकारच्या प्रशिक्षणांचे नियोजन, प्रत्यक्ष सहभाग व अंमलबजावणी करणे
४. विभागांतर्गत प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या संपर्कात राहणे, त्यांना आवश्यक असल्यास मार्गदर्शन करणे
५. राष्ट्रीय पातळीवर NIEPA, NCERT, NCTE यांच्या बैठका, प्रशिक्षणे, विविध कार्यशाळांना उपस्थित राहून त्याचा अहवाल सादर करणे
६. NEP टास्क विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी कार्यक्रमांची आखणी व नियोजन करणे
७. वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी विभाग व उपविभागप्रमुखास सहाय्य करणे. यासाठी शासन निर्णयांचा अभ्यास, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर घडत असलेले नवोपक्रमांचा अभ्यास इत्यादीबाबत माहिती करुन घेणे
८. विभागांतर्गत कार्ययोजनेनुसार प्रस्तावित विविध प्रशिक्षण, कार्यशाळा व उपक्रम यांचे नियोजन करणे
९. विभागासाठी आवश्यक सांख्यिकी माहिती वेळोवेळी उपलब्ध करुन व ती अद्ययावत करुन जतन करणे इ. कामे संबंधित विभागाच्या लिपिक / विषय सहाय्यक यांच्याकडून करवून घेणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठांकडे सादर करणे
१०. राज्य, विभागस्तरीय प्रशिक्षणाची गुणवत्ता व सनियंत्रण करण्यासाठी विभागाच्या नियोजनानुसार भेटी देणे
११. विभागांतर्गत लागणा-या प्रशिक्षणांचे साहित्य छपाई व वितरण नियोजन करुन अंमलबजावणी करणे
१२. राज्यस्तरीय प्रशिक्षणाच्या वेळी उपस्थिती, प्रवास व दैनिक भत्ता देयक भरुन घेणे, प्रमाणपत्र / उपस्थिती पत्रक वाटप करणे इत्यादीबाबतचे नियोजन करुन विषय सहाय्यकांच्या मदतीने कामकाज पूर्ण करणे
१३. प्रशिक्षणाचे अनुधावन कार्यक्रमानुसार प्राप्त माहितीचे विश्लेषण करणे
१४. विभागाद्वारे राबविले जाणारे प्रशिक्षण / उपक्रम यांच्या मूल्यमापनासाठी उपविभागप्रमुख यांच्या सल्ल्याने साधन विकसित करणे, त्याची रुपरचना ठरविणे आणि त्याद्वारे उपलब्ध माहितीचे विश्लेषण करणे
१५. प्रशिक्षण व कार्यक्रमांमध्ये आवश्यकता असल्यास स्वतः सत्रांची तयारी करणे व सत्र घेणे
१६. माहिती अधिकारी मासिक प्रपत्र संकीर्ण विभागास सादर करणे
१७. स्टार्स प्रकल्प अंतर्गत अनुदान मागणीच्या प्रक्रियेत विभागप्रमुखांना सहाय्य करणे
१८. विभागांतर्गत होणा-या प्रशिक्षणाच्या निधी मागणीची फाईल व सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे इ. कामे संबंधित विभागाच्या लिपिक / विषय सहाय्यक यांच्याकडून करवून घेणे
१९. विविध उपक्रमांसाठी निधी मागणीची फाईल व सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे इ. कामे संबंधित विभागाच्या लिपिक / विषय सहाय्यक यांच्याकडून करवून घेणे व वेळोवेळी समग्र शिक्षा अभियान व लेखा विभाग यांना उपलब्ध करुन देणे
२०. राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय होणा-या प्रशिक्षणासाठी अनुदान वितरण करणे व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे
२१. विभाग प्रमुख व उपविभागप्रमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार कार्यालयीन कामकाजाचे दैनंदिन व साप्ताहिक प्राधान्यक्रम देऊन सनियंत्रण करणे
२२. राज्यात होणा-या शिक्षण परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण व कार्यक्रम इ. हे गरजाधारित होण्यासाठी संबंधित विभाग आणि अधिकारी यांना सहयोग देणे,br
२३. विभागांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून विभागाचे काम उत्कृष्ट होईल या दृष्टीने प्रयत्न करणे
२४. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील इतर विभाग, क्षेत्रिय कार्यालय, सामाजिक संस्था, बाहय संस्था व शासन स्तरावर संपर्क ठेवणे
४. विषय सहाय्यक यांचे कार्यविवरण
१. विभागांतर्गत कार्ययोजनेनुसार प्रस्तावित विविध प्रशिक्षण, कार्यशाळा व उपक्रम यांचे नियोजन करणे, दर्जेदार ठिकाण निश्चित करणे.
२. विभाग प्रमुख व उपविभागप्रमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार कार्यालयीन कामकाजाचे दैनंदिन व साप्ताहिक कामकाज प्राधान्यक्रम लक्षात घेऊन पूर्ण करणे.
३. विभागासाठी आवश्यक सांख्यिकी माहिती वेळोवेळी उपलब्ध करुन व ती अद्ययावत करुन जतन करणे व आवश्यकतेनुसार वरिष्ठांकडे सादर करणे.
४. विभागांना व इतर संलग्न कार्यालयांना निधी वितरीत करताना व खर्च शिल्लक निधी तपासणे. तसेच, संबंधित वरिष्ठ कार्यालयांना व विभागांना उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे.
५. विभागांतर्गत लागणा-या प्रशिक्षणांचे साहित्य छपाई व वितरण नियोजन विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करणे व अंमलबजावणी करणे.
६. राज्यस्तरीय प्रशिक्षणाच्या वेळी उपस्थिती, प्रवास व दैनिक भत्ता देयक भरुन घेणे, प्रमाणपत्र / उपस्थिती पत्रक वाटप करणे इत्यादीबाबतचे नियोजन करुन वरिष्ठांच्या सल्याने कामकाज पूर्ण करणे.
७. स्टार्स प्रकल्प अंतर्गत अनुदान मागणीच्या प्रक्रियेत विभागप्रमुखांना सहाय्य करणे.
८. विभागांतर्गत होणा-या प्रशिक्षणाच्या निधी मागणीची फाईल व सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे
९. विविध उपक्रमांसाठी निधी मागणीची फाईल व सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे व वेळोवेळी समग्र शिक्षा अभियान व लेखा विभाग यांना उपलब्ध करुन देणे.
१०. राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय होणा-या प्रशिक्षणासाठी अनुदान वितरण करणे व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे.
११. विभागांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत योग्य समन्वय साधून विभागाचे काम उत्कृष्ट होईल या दृष्टीने प्रयत्न करणे.
विभागामार्फत तयार साहित्य