Accessibility Tools

Text-to-Speech

Currently reading:

State Council of Educational Research and Training, Maharashtra

संकीर्ण विभाग - स्थापना, संरचना, उद्दिष्टे, उपक्रम | SCERT Maharashtra

विभागाचे नाव :- संकीर्ण


विभागाची स्थापना :-

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक-डायट :45 16/( 40 16)/प्रशिक्षण, दि.17 ऑक्टोबर 2016 अन्वये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ची पुनर्रचना करण्यात आली असून राज्यस्तरावर पूर्वी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे पुनर्रचना करून संकीर्ण विभागाची स्थापना करण्यात आली.

विभागाची संरचना / पदसंरचना :-

अ. न. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
1 प्राचार्य/उपसंचालक 1 1
2 प्रशासन अधिकारी /वरिष्ठ अधिव्याख्याता 1 1
3 अधीक्षक / अधिव्याख्याता 1 1
4 विषय सहाय्यक 1 1
5 लिपिक डाटा एंट्री ऑपरेटर 1 -
6 कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएस आर च्या मदतीने - -
7 शिपाई 1 1
एकूण 6 5

विभागाची उद्दिष्टे :-

  • मासिक व वार्षिक माहिती अधिकार अहवाल संकलन करणे व एकत्रित अहवाल मा. शासकीय व मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना पाठविणे.
  • संकीर्ण स्वरुपाच्या पत्रव्यवहाराचा निपटारा करणे.
  • विधान मंडळाचे हिवाळी,पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत तारांकित, अतारांकित प्रश्ने, लक्षवेधी सूचना, ठराव, यांच्या उत्तराचा अहवाल पूरक टिपणीसह नियमितपणे शासनास पाठविण्यासाठी विभागांना निर्देशित करणे . तसेच अधिवेशन कालावधीत परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांचे वेळापत्रक नेमून देणे व त्याप्रमाणे उपस्थिती घेणे.
  • परिषदेतील नागरिकांची सनद अद्यावत करणे व प्रदर्शित करणे.
  • माहिती अधिकारांतर्गत परिषदेतील जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची यादी अद्यावत करून घोषित करणे.
  • राज्यस्तरीय विषय शिक्षक संघटनेला अनुदान वितरण व कार्यवाही करणे. तसेच त्यांची वार्षिक बैठक आयोजित करणे.
  • परिषदेमध्ये राष्ट्रीय सण ,राष्ट्रपुरुषांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  • ATR (Action Taking Report) मा.आयुक्त कार्यालय तसेच शासनास पाठविणे.
  • विविध बैठकींबाबतची माहिती परिषदेतील सर्व संबंधित विभागांकडून संकलित करून एकत्रितरीत्या वरिष्ठ कार्यालयास पाठविणे.

विभागातील कामे / उपक्रम:

अ.न. उपक्रम उपक्रमाचा तपशील सुरु असलेली कार्यवाही
१ माहिती अधिकार माहिती अधिकार मासिक अहवाल तसेच वार्षिक अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवणे. सर्व विभागांकडून माहिती संकलन.
२ जयंती/पुण्यतिथी राष्ट्रीय सण ,सेवापूर्ती कार्यक्रम जयंती, पुण्यतिथी तसेच परिषदेतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचे निवृत्ती समारंभ साजरा करणे. तसेच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय सण नियोजित करून साजरे करणे. शासन प्राप्त यादीनुसार जयंती, पुण्यतिथी साजरे करणे व त्या अनुषंगाने तयारी करणे.
3 लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद प्रश्न/ ठराव/सूचना हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन तारांकित, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, ठराव यासंदर्भातील परिषदेतील विविध विभागाकडून एकत्रित करून एकत्रित अहवाल अधिवेशन काळात शासनास पाठवणे. तसेच अधिवेशन काळात कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजाची जबाबदारी देणे. विभागांकडून सर्व प्रश्नांचे संकलन
४ ATR अहवाल मा.मंत्री, मा.सचिव यांच्या बैठकीसाठी परिषदेशी संबंधित विषयाची माहिती विविध विभागाकडून एकत्र करून वरिष्ठ कार्यालयास पाठवणे. विभागांकडून विषयनिहाय माहितीचे संकलन करणे.
५ शिक्षक संघटना शिक्षक संघटनांना प्रत्येकी २०,०००/- रुपये अनुदान उपलब्ध होण्यासाठी मा. शिक्षण आयुक्तालय यांच्याकडे अनुदानाची मागणी करणे व अनुदान उपलब्ध करून देणे - अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच संघटनांना अनुदान प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अनुदानाचा उपयोग कशा पद्धतीने केला याची माहिती घेण्यासाठी एक दिवसाच्या बैठकीचे आयोजन करणे. अनुदान प्राप्तीसाठी पाठपुरावा करणे.
६ नागरिकांची सनद परिषदेतील विभागनिहाय नागरिकांची सनद यांची माहीती संकलन करून ती मंजूर करून घेणे व घोषित करणे याबाबतची सर्व कार्यवाही करणे. तसेच सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना आपापली सनद कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बाबतचे आदेश देणे. कार्यवाही पूर्ण
७ माहिती अधिकार विभाग निहाय जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची माहीती संकलन करून ती मंजूर करून घेणे व घोषित करणे याबाबतची सर्व कार्यवाही करणे. कार्यवाही पूर्ण
८ संकीर्ण पत्रे संकीर्ण स्वरूपाची पत्रे व इतर कार्यालयाशी पत्रव्यवहार करणे. संकीर्ण स्वरूपाची पत्रे व इतर कार्यालयाशी पत्रव्यवहार.
९ आर्थिक नस्ती सर्व उपक्रम/प्रशिक्षणे यासंदर्भातील आर्थिक नस्ती तयार करणे. आर्थिक नस्ती तयार करून मंजूरीकरीता सादर करणे.

फोटोगॅलरी :-

Co_ordination_01 Co_ordination_02
Co_ordination_03 Co_ordination_04
Co_ordination_05 Co_ordination_06
Co_ordination_07 Co_ordination_08

उपक्रम/संलग्नता


सूचना

आपण maa.ac.in या संकेतस्थळाच्या बाहेर जात आहात. पुढे जायचे आहे का?

होय, पुढे जा