लेखा विभाग
विभागाची स्थापना / पुनर्रचना :-
1) महाराष्ट्र शासन शिक्षण व सेवा योजना विभागाकडील शासन निर्णय क्रमांक ‘पीटीसी
1084/6895(35/84) माशि 4, दिनांक 31 ऑगस्ट 1984 नुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद या संस्थेची पुणे येथे निर्मिती करण्यात आली.
2) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: डाएट-4516/( 4016)/प्रशिक्षण,
दि.17 ऑक्टोबर 2016 अन्वये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे या
कार्यालयाची पुनर्रचना करण्यात आली आहे.
विभागाची संरचना / पदसंरचना :-
अ.क्र. |
पदाचे नाव |
मंजूर पदे |
कार्यरत पदे |
१. |
सहायक संचालक |
१ |
१ |
२. |
लेखाधिकारी |
१ |
१ |
३. |
लिपिक /डाटा एन्ट्री ऑपरेटर |
८ |
५ |
४. |
शिपाई |
१ |
१ |
विभागाचे कामकाज :-
1. कार्यालयीन खर्च देयक सादर करणे, रोखनोंद वही लिहीणे, सर्व देयकांची अभिलेख जतन ठेवणे.
2. कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन तसेच त्या अनुषंगीक सर्व लाभ याबाबत देयके
सादर करणे.
3. कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे वेद्यकीय देयके प्रतिपूर्ती करणे व तसेच प्रवास भत्ता
देयक व बदली प्रवास भत्ता देयक सादर करणे , व घरबांधणी , मोटार सायकल अग्रिम देयक सादर
करणे.
4. प्रस्तुत कार्यालयातील व अधिनस्त कार्यालयातील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांचे , व
तसेच विभागीय शिक्षण उपसंचाल, सर्व यांचे चारमाही, आठमाही, अकरामाही लेखाशिर्षनिहाय
अंदाजपत्रक सादर करणे व अर्थसंकल्प सादर करणे, व तसेच अधिनस्त कार्यालयास अनुदान
वितरीत करणे.
5. सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांची सर्व लाभांची देयके सादर करणे, सेवानिवृत्त प्रकरणिका
तयार करणे व तसेच गट विमा योजनाची देयके सादर करणे.