विभागाची स्‍थापना


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: डाएट-45 16/( 40 16)/प्रशिक्षण, दि.17 ऑक्टोबर 2016 अन्वये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ची पुनर्रचना करण्यात आली असुन राज्यस्तरावर पूर्वी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे पुनर्रचना करून संकीर्ण विभागाची स्थापना करण्यात आली.

विभागाची उद्दिष्ट्ये


१) मासिक व वार्षिक माहिती अधिकार अहवाल संकलन करणे व एकत्रित अहवाल मा. शासनास व मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना  पाठविणे.

2) संकीर्ण स्वरूपाच्या पत्रव्यवहाराचा निपटारा करणे.

३) विधान मंडळाचे हिवाळी,पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत तारांकित व अतारांकित प्रश्नांच्या उत्तराचा अहवाल नियमितपणे शासनास पाठवणे. तसेच अधिवेशन कालावधीत परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांचे वेळापत्रक निश्चित करून त्यांच्या उपस्थितीचा अहवाल करणे.

४) परिषदेची नागरिकांची सनद अद्ययावत करणे व प्रदर्शित करणे.

५) माहिती अधिकारांतर्गत परिषदेतील जनमाहिती अधिकारी व प्रथम अपीलिय अधिकारी यांची यादी अद्ययावत करून घोषित करणे 

६)राज्यस्तरीय विषय शिक्षक संघटना अनुदान वितरण व कार्यवाही करणे. तसेच त्यांची वार्षिक बैठक आयोजित करून इतिवृत्त तयार करणे.

७) परिषदेमधील राष्ट्रीय सण उत्सव राष्ट्रीय पुरुषांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांचे आयोजन करणे.

८) परिषदेमधील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमांचे आयोजन करणे.

९) ATR (Action Taking Report) मा.आयुक्त कार्यालय तसेच शासनास पाठविणे.  

महत्वाचे शासन निर्णय


१) राज्यस्तरीय मान्यताप्राप्त विषय शिक्षक संघटना अनुदान वाढीबाबत दि.१० मे १९९६.

२)  महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम २००५ दि.१५ जून २००५. 

3) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांच्या नावाचे फलक लावणेबाबत दि. २२ मे २००८. 

४) राष्ट्रपुरुष जयंती,पुण्यतिथी साजरे करणेबाबत..

विभागाची पद संरचना


अ.क्र. पदाचे नाव मंजूर पद भरलेली पद कार्यरत कर्मचाऱ्यांचे नाव शेरा
प्राचार्य/उपसंचालक श्री.रमाकांत काठमोरे मुळ कार्यभार
प्रशासन अधिकारी /वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. दिपक माळी मुळ कार्यभार
अधीक्षक / अधिव्याख्याता डॉ. चंदन कुलकर्णी मुळ कार्यभार
विषय सहायक श्रीम. भक्ती जोशी मुळ कार्यभार
लिपिक डाटा एन्ट्री ऑपरेटर रिक्त -
कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकाना सीएस आर च्या मदतीने - - - -
शिपाई श्री. संपत साळुंके मुळ कार्यभार

विभागातील कामे


अ.क्र. उपक्रम उपक्रमाचा तपशील सुरु असलेली कार्यवाही
माहिती अधिकार माहिती अधिकार मासिक अहवाल तसेच वार्षिक अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवणे . सर्व विभागांकडून माहिती संकलन
जयंती/पुण्यतिथी राष्ट्रीय सण ,सेवापूर्ती कार्यक्रम जयंती, पुण्यतिथी तसेच परिषदेतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचे निवृत्ती समारंभ साजरा करणे . तसेच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय सण नियोजित करून साजरे करणे . शासन प्राप्त यादीनुसार जयंती, पुण्यतिथी साजरे करणे व त्या अनुषंगाने तयारी करणे .
लोकसभा , विधानसभा, विधानपरिषद प्रश्न/ ठराव/सूचना हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन  तारांकित, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, ठराव यासंदर्भातील परिषदेतील विविध विभागाकडून एकत्रित करून एकत्रित अहवाल अधिवेशन काळात शासनास पाठवणे . तसेच अधिवेशन काळात कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजाची जबाबदारी देणे . विभागांकडून सर्व प्रश्नांचे संकलन
ATR अहवाल मा.मंत्री, मा.सचिव यांच्या बैठकीसाठी परिषदेशी संबंधित विषयाची माहिती विविध विभागाकडून एकत्र करून वरिष्ठ कार्यालयास पाठवणे. विभागांकडून विषयनिहाय माहितीचे संकलन करणे.
शिक्षक संघटना शिक्षक संघटनांना प्रत्येकी २०,०००/- रुपये अनुदान उपलब्ध होण्यासाठी मा . शिक्षण आयुक्तालय यांच्याकडे अनुदानाची मागणी करणे व अनुदान उपलब्ध करून देणे - अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच संघटनांना अनुदान प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अनुदानाचा उपयोग कशा पद्धतीने केला याची माहिती घेण्यासाठी एक दिवसाच्या बैठकीचे आयोजन करणे . अनुदान प्राप्तीसाठी पाठपुरावा करणे.
नागरिकांची सनद परिषदेतील विभागनिहाय नागरिकांची सनद यांची माहीती संकलन करून ती मंजूर करून घेणे व घोषित करणे याबाबतची सर्व कार्यवाही करणे. तसेच सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना आपापली सनद कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बाबतचे आदेश देणे. कार्यवाही पूर्ण
माहिती अधिकार विभाग निहाय जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची माहीती संकलन करून ती मंजूर करून घेणे व घोषित करणे याबाबतची सर्व कार्यवाही करणे . कार्यवाही पूर्ण
संकीर्ण पत्रे संकीर्ण स्वरूपाची पत्रे व इतर कार्यालयाशी पत्रव्यवहार करणे . संकीर्ण स्वरूपाची पत्रे व इतर कार्यालयाशी पत्रव्यवहार .
आर्थिक नस्ती सर्व उपक्रम/प्रशिक्षणे यासंदर्भातील आर्थिक नस्ती तयार करणे. आर्थिक नस्ती तयार करून मंजूरीकरीता सादर करणे.

फोटो गॅलरी