विभागाची स्‍थापना


१७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार या शैक्षणिक संस्थांची पुनर्रचना करण्यात आली आणि ह्या पुनर्रचनेच्या अंतर्गत राज्य स्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र ,पुणे येथे  स्वतंत्र गणित विभागाची स्थापना करण्यात आली.

विभागाची उद्दिष्ट्ये


  • प्रत्येक मुलाच्या गणित संबोध विकसनासाठी अध्ययन प्रयत्न करणाऱ्या गणित शिक्षकांचे सक्षमीकरण व प्रगल्भीकरण करणे.
  • पूर्व प्राथमिक स्तर ते उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गणित विषयाची संपादणूक वाढविण्याकरिता  उपक्रमांची आखणी ,नियोजन ,अंमलबजावणी व पाठपुरावा करणे.

महत्वाचे शासन निर्णय


विभागाची पद संरचना


विभाग :समन्वय 

विभागप्रमुख / प्राचार्य / उपसंचालक नाव : डॉ.कमलादेवी आवटे

उपविभागाचे नाव: गणित
उपविभागाचा ईमेल आय. डी: [email protected]
उपविभागप्रमुख नाव: श्रीम.मनीषा यादव
संपर्क क्रमांक: ९७६७४४२०२०
अधिव्याख्याता नाव: श्रीम.वृषाली गायकवाड
संपर्क क्रमांक: ९७६५७८४१३६
विषय सहाय्यक नाव: रिक्त पद

विभागातील कामे


विभागाची कार्ये:

अ) पूर्व प्राथमिकस्तर ते उच्च माध्यमिक स्तरावरील गणित विषय शिक्षकांना प्रशिक्षण देऊन गणित विषयामध्ये प्रगल्भ व सक्षम करण्याकरिता नियोजन करणे.

 ब) विद्यार्थ्यांच्या गणितीय संकल्पना व गणितीय क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांची क्षमता  प्रशिक्षणांच्या व इतर माध्यमांतून विकसित करणे.

  • घटकसंच निर्मिती,पथदर्शी,प्रशिक्षण नियोजन आराखडा ,अमलबजावणी आराखडा ,प्रशिक्षण साहित्य निर्मिती,निर्मिती कार्यशाळा नियोजन इ.

क)गणित विषयासाठी राज्य ,विभाग ,जिल्हा,तालुका स्तरावर प्रशिक्षण नियोजन व आराखडा तयार करणे.

ड) प्रशिक्षणानंतरच्या मूल्यमापन व आढावा तसेच पाठपुरवा करणे.

  • प्रशिक्षण परीणामकारकता अभ्यास नियोजन.

इ) राज्य ,विभाग ,जिल्हा,तालुका स्तरावर होणाऱ्या प्रशिक्षणासाठी सनियंत्रण करणे.

  • प्रशिक्षण क्षेत्र भेट 
  • प्रशिक्षण उत्तर शाळा भेट 
  • प्रशिक्षण अहवाल 

फ) गणित विषयासाठी विविध माध्यमाकरिता पूरक साहित्य निर्मिती करणे.

  • गणित विषयाचे इ साहित्य निर्मिती,पुनर्निर्मिती,पुनरावलोकन इ.
  • विद्यार्थी पूरक अध्ययन साहित्य -कार्यपुस्तिका , Remedial material ,कृती पुस्तिका.
  • विद्यार्थी मूल्यमापन साहित्य निर्मिती-अध्ययन निष्प्प्ती आधारित प्रश्न पेढी निर्मिती, प्रश्न पेढी इ.
  • संदर्भ साहित्य 
  • शिक्षकांसाठी पूरक अध्ययन-अध्यापन साहित्य 
  • Supplementary learning enrichment kit development.

ग) गणित विषय अंतर्गत संशोधन करणे.

म) विविध खाजगी संस्था तसेच स्वयंसेवी संस्था (NGO)यांचे मार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम  तसेच निर्मित साहित्य ,विविध प्रस्ताव याबाबत अभिप्राय सादर करणे,संबंधित संस्थेकडून निर्मित छापील तसेच ई-साहित्य तपासणे व प्रमाणित करणेविषयक पुढील कार्यवाही करणे.

 

राबविण्यात आलेले प्रमुख उपक्रम:

  • इयता पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी गणित संबोध प्रशिक्षण 
  • इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्तर आधारित उपक्रम व साहित्य निर्मिती 
  • इयत्ता नववी व दहावीच्या शिक्षकांसाठी आय.आय.टी. मुंबई यांच्या मदतीने शिक्षण प्रशिक्षण 
  • इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांसाठी ALP उपक्रम 
  • अध्ययन स्तर निश्चिती 
  • कोविड कालावधीतील शाळा बंद पण शिक्षण सुरु उपक्रम –स्वाध्याय ,अभ्यासमाला उपक्रम 
  • विविध पूरक साहित्य निर्मिती 
  • ई-साहित्य निर्मिती 
  • निपुण भारत अभियान 
  • निपुण मित्र 
  • निपुनोत्सव 
  • गणितोत्सव 
  • इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षक मार्फत मार्गदर्शन 
  • मुल्यांकन चाचणी –पायाभूत ,संकलित-१ ,संकलित-२ .
  • सेतू अभ्यासक्रम निर्मिती व अंमलबजावणी 

पूरक साहित्य- शिक्षक व विध्यार्थी करिता  

  • भास्कराचार्य गणिताचार्य समृद्धी संच 
  • भाषा-गणित अध्ययन समृद्धी संच 
  • निपुण भारत अभियान अंतर्गत निर्मित इयत्ता पहिली ते पाचवी करूया मैत्री गणिताशी कार्यपुस्तिका
  • निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन 
  • मुल्यांकन चाचणी –पायाभूत ,संकलित-१ ,संकलित-२
  • पोस्टर्स 
  • इयत्ता पहिली ते दुसरी शिक्षकांसाठी शिक्षक मार्गदर्शिका 
  • इयत्ता पहिली  ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यास निर्मिती –सन २०२१-२२,सन २०२२-२३ ,सन २०२३-२४
  • इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थी करिता प्रश्न पेढी 
  • इयत्ता नववी ते बारावी शिक्षक मार्गदर्शिका 
  • इयत्ता नववी ते बारावी सुलभक  मार्गदर्शिका 
  • खेळ आधारित जादुई गणित पुस्तिका 

फोटो गॅलरी