विभागाची स्‍थापना


१६ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार राज्यशैक्षणिकसंशोधनवप्रशिक्षणपरिषद,महाराष्ट्र, पुणे ची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार  संशोधन विभागाची स्थापना करण्यात आली.

विभागाची उद्दिष्ट्ये


  1. राज्यातील विविध शैक्षणिक समस्यांचा शोध घेऊन त्यावरआधारित राज्यस्तरावरून किंवा जिल्हास्तरावरून लघुसंशोधन प्रकल्प हाती घेण्यासअधिव्याख्याता व संबधितप र्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना प्रवृत्त करणे.
  2. शिक्षकांनी शैक्षणिक समस्या सोडविण्याकरिता कृतीसंशोधन प्रकल्प हाती घेण्यासाठीत्यांनाप्रशिक्षणवआवश्यकतेमार्गदर्शनकरणे. 
  3. राज्यातील शिक्षक ते पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्यातील नवोपक्रमशील ते सचालना देण्यासाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करणे. 
  4. राज्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी उत्कृष्ट नवोपक्रमांचे संकलन करून त्यांचे सार्वत्रिकीकरण करणे.
  5. कार्यालयातील इतर विभागातील शैक्षणिक उपक्रमांना संशोधनात्मक सहाय्य करणे.
  6. SCERT, महाराष्ट्र अंतर्गत सर्व विभागांचा वार्षिक कार्य अहवाल इंग्रजी व मराठी भाषेमध्ये छपाई करून प्रसिद्ध करणे. 
  7. राज्यात घेतलेल्या विविध शैक्षणिक संशोधनावर आधारित शोध निबंधांचे संकलन करून उत्कृष्ट शोध निबंध रिसर्च बुलेटीन या अंकात प्रसिद्ध करणे.
  8. शैक्षणिकसंशोधनकरणा-याघटकांनाआवश्यतेनुसारविविधसंशोधनअहवालसंदर्भासाठी उपलब्धकरूनआवश्यकतेनुसारमार्गदर्शनकरणे.

महत्वाचे शासन निर्णय


विभागाची पद संरचना


अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे अधिकारी / कर्मचारी नावे संपर्क क्र.
उपसंचालक डॉ. कमलादेवी आवट ९४२१३०४३७३
गट - अ डॉ. दत्तात्रय थिटे ९१३०८५८०५६
गट - ब डॉ. विद्या बोरसे ९९६०७५१४२१
गट – क विषय सहाय्यक डॉ. सतिश सातपुते ९४२२४७११९७
डाटा एन्ट्री ऑपरेटर रिक्त - -
शिपाई श्रीम. गावडे

विभागातील कामे


१) ब्लेंडेड कोर्स 
उद्दिष्टे:
  १.शिक्षकांसाठीब्लेंडेड मोड कोर्स विकसित करणे.
  २.तयार केलेला ब्लेंडेड मोड कोर्स दीक्षा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे.
  ३.ब्लेंडेड मोड कोर्सचा पथदर्शी अभ्यास करणे.
  ४. पथदर्शी अभ्यासाद्वारे आलेल्या निष्कर्षाच्या आधारे या कोर्समध्ये सुधारणा करून अंतिमीकरण करणे.
६) ब्लेंडेड व ऑनलाईन कोर्स शिक्षकांसाठी उपलब्ध करून देणे.

कार्यपद्धती : 
तज्ज्ञांनी तयार केलेल्या घटक संचाचे ऑनलाईन चर्चासत्रामध्ये अंतिमिकरण करण्यात आले. तयार झालेल्या घटक संचावर तीन विद्यापीठाकडून अभिप्राय मागविण्यात आले. तयार झालेल्या घटक संचांचे पुस्तक रूपाने प्रकाशन करण्यात येणार आहे. या कोर्सचे मेंटोरिंग आणि मूल्यांकन करण्यासाठी विविध साधने विकसित करण्यात आली. या कोर्सच्या व्हीडीओ निर्मितीसाठी PPT तयार करून झूम मिटींगच्या आधारे रेकोर्डिंग करून व्हीडीओ  निर्मिती करण्यात आली. अशाप्रकारे तयार झालेला कोर्स दीक्षा प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला. त्यानंतर दि.१४ जानेवारी रोजी जिल्हास्तरावरील मेंटोरसाठी या कोर्सचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पहिल्या टप्प्यामध्ये मेंटोरसाठी २ उद्बोधन कार्यशाळा घेण्यात आल्या. 
यापद्धतीने टप्प्याटप्प्याने हा कोर्स चालू राहणार आहे. या कोर्सच्या पथदर्शी अभ्यासासाठी पुणे, बीड, वर्धा, सिंधुदुर्ग, नाशिक व बुलढाणा या ६ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या कोर्सची अंमलबजावणी चार टप्प्यात होणार आहे. कोर्सच्या कालावधीत ऑनलाईन/ऑफलाईन मिटिंग झालेल्या आहेत. या पथदर्शी अभ्यासाद्वारे आलेल्या निष्कर्षांच्या आधारे आवश्यकतेनुसार आणि सूचनांनुसार कृतिसंशोधन ब्लेंडेड मोड कोर्सचे मूल्यांकन आणि सुधारणा करून अंतिमीकरण करण्यात आलेला आहे. 
गट साधन स्तरावर PLC घेण्यासाठी राज्यस्तर व जिल्हास्तरावर कार्यशाळा घेऊन पुर्व तयारी करण्यात आली असून लवकरच कोर्स कार्यान्वित होणार आहे.

२.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 
उद्दिष्टे :
  1. पूर्व प्राथ. ते उच्च माध्य. स्तरावरील शिक्षक व अधिकाऱ्यांच्या नवोपक्रमशीलतेस वाव देणे.
  2. पूर्व प्राथ. ते उच्च माध्य. स्तरावरील शिक्षक व अधिकाऱ्यांना विविध नवोपक्रम हाती घेण्यास प्रेरणा देणे.
  3. पूर्व प्राथ. ते उच्च माध्य. स्तरावरील शिक्षक व अधिकारी यांनी राबविलेले नवोपक्रम ऑनलाईन प्रसिद्ध करणे.
कार्यपद्धती : 
  राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा या ऑनलाइन पद्धतीने खालील पाच गटामध्ये घेण्यात येते. 
     1. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका 
     2. प्राथमिक शिक्षक व  मुख्याध्यापक
     3. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
     4. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती
     5. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व  अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य/उपसंचालक)
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येतात. सदर स्पर्धेचे पहिल्या टप्प्यातील गट १ ते ३ चे मूल्यांकन जिल्हास्तरावर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) व गट ४ व गट ५ चे मूल्यांकन विभागस्तरावर (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) करण्यात येते. सर्व गटातील गुणानुक्रमे प्रथम पाच क्रमांकांपैकी ७५% पेक्षा जास्त गुण असणाऱ्या नवोपक्रमांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येते. 
जिल्हा व RAA स्तरावरून आलेल्या उत्कृष्ट नवोपक्रमांचे राज्यस्तरावर तज्ज्ञांकडून पहिल्या फेरीतील ऑनलाईन मूल्यांकन (अहवाल परीक्षण) पूर्ण करण्यात येते. या मुल्यांकनानुसार प्रत्येक गटातून उत्कृष्ट १० स्पर्धकांना दुसरी फेरी म्हणजेच नवोपक्रम सादरीकरण ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात येते. अशाप्रकारे ऑनलाईन मूल्यमापन व अहवाल सादरीकरण यावरून विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात येते. 
संशोधन विभागाच्या वतीने राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित केल्यामुळे राज्यातील केवळ शिक्षकच नव्हे तर विषय सहायक व विषय साधन व्यक्ती व सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांनी सुद्धा नवोपक्रम राबवून त्याचे दस्तावेजीकरण करण्यावर भर दिला गेला आहे. या उपक्रमामुळे उत्कृष्ट नवोपक्रमांना प्रसिद्धी मिळाली. निवडक  नवोपक्रम पुस्तिकेच्या रूपाने प्रसिद्ध करण्यात आली आहे.  


३.कार्यालयाचा वार्षिक अहवाल 
उद्दिष्टे :
   SCERT,महाराष्ट्र अंतर्गत सर्व विभागांचा वार्षिक कार्य अहवाल इंग्रजी व मराठी भाषेमध्ये छपाई करून प्रसिद्ध करणे.

कार्यपद्धती :
    राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या संस्थेचा मागील शैक्षणिक वर्षामधील कार्याचा अहवाल मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून प्रकाशित करण्यासाठी परिषदेतील सर्व विभागाकडून विहित     नमुन्यात केलेल्या कार्याचा अहवाल मागवून घेण्यात आला व त्याचे संकलन करण्यात येते. सर्व विभागांच्या प्राप्त अहवालावर संशोधन विभागामार्फत संपादन व संस्करण करण्यात येते. त्यानुसार दरवर्षी कार्यालयाचा वार्षिक कार्य अहवाल मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत छपाई करण्यात येतो.
SCERT अंतर्गत सर्व विभागांचे शैक्षणिक कार्य अहवालाद्वारे सर्वांपर्यत पोहोचण्यास मदत होते.

४.रिसर्च बुलेटीन 
उद्दिष्टे :
    1. शालेय शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयुक्त संशोधन लेख (रिसर्च पेपर) प्रकाशित करणे.
    2. शालेय शिक्षणाशी संबंधित असलेल्या विद्यमान समस्यांविषयी संशोधन करून प्रसिद्ध करण्यासाठीशिक्षक व अधिकाऱ्यांना प्रेरित करणे.
    3. राज्यात घेतलेल्या विविध शैक्षणिक संशोधनावर आधारित शोध निबंधांचे संकलन करणे.
कार्यपद्धती : 
     राज्यातील शिक्षक व अधिकारी यांचेकडून रिसर्च बुलेटिनसाठी प्रकाशित करण्यासाठी शोध निबंध मागविण्यात आले. प्राप्त झालेल्या शोध निबंधांचे निकषानुसार तज्ज्ञांद्वारे छाननी करण्यात आली. यानंतर निवडलेल्या शोध निबंधांचे रिसर्च बुलेटिनसाठी संपादन करण्यात आले.  शेवटी संपादित शोध निबंधांचे रिसर्च बुलेटिन मार्च २०२१ या अंकात छपाई करण्यात आली. या रिसर्च बुलेटीनचे जिल्हा व तालुका स्तरावर वितरण करण्यात आले आहे.
   1) शालेय शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयुक्त संशोधन लेख (रिसर्च पेपर) सर्व शिक्षक आणि अधिकारी यांना उपलब्ध असतील.
   2) शिक्षक आणि अधिकारी शिक्षणाशी संबंधित असलेल्या विद्यमान समस्यांवर संशोधन करण्यास प्रवृत्त होतील.
   3) राज्यात घेतलेल्या विविध शैक्षणिक संशोधनावर आधारित शोध निबंधांचे संकलन होईल.

 ५) सहकार्यातून (सगुण) विकास कार्यक्रम (Twinningof School) 
उद्दिष्टे : 
MHRD मार्फत प्रसिद्ध PGI (Performance grade index) अहवालामध्ये निर्देशित केलेल्या Twinning/ Partnership of School या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करून शाळा व एकूणच शैक्षणिक गुणवत्ता विकास साधण्यासाठी सहकार्यातून गुणवत्ता (सगुण) विकास कार्यक्रम हाती घेणे. 
कार्यपद्धती : 
MHRD मार्फत प्रसिद्ध PGI अहवालामध्ये निर्देशित केलेल्या Twinning/ Partnership of School या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करून शाळा व एकूणच शैक्षणिक गुणवत्ता विकास साधण्यासाठी SCERT अंतर्गत संशोधन विभागामार्फत सहकार्यातून गुणवत्ता (सगुण) विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमाच्याअंमलबजावणीकरिता सगुण विकास कार्यक्रमाचे स्वरूप, उद्दिष्टे, तत्त्वे, कार्यवाहीचे स्वरूप तसेच सनियंत्रण प्रणाली आणि सगुण विकास कार्यक्रमांतर्गत सहकार्याची क्षेत्रे या सर्व मुद्द्यांचा समावेश असलेली मार्गदर्शक सूचना प्रणाली विकसित करण्यात आली. 
यासाठी राज्यस्तरावरून सर्वे मंकीच्या माध्यमातून लिंक देण्यात आली व या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रत्येक केंद्रातील एक मुख्य शाळा व एक सहभागी शाळा अशा दोन शाळा सगुण विकास कार्यक्रमांतर्गत सहभागी करून घेण्यात आल्या. सहकार्यातून गुणवत्ता विकास करण्यासाठी शाळांना भौतिक सुविधांचा सामाईक वापर, परिणामकारक अध्ययन अध्यापन व मूल्यमापन, सहशालेय उपक्रम, सामाजिक जाणीवेतून समस्या निराकरण, शालेय नेतृत्व व व्यावसायिक विकास, समाज सहभाग, समता व समानसंधी अशी एकूण सात क्षेत्रे सुचविण्यात आली आहेत. त्यानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे.
मार्च २०१९ पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात आज पर्यंत ६२००० शाळांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. या कार्यक्रमात एका परिसरातील दोन शाळा एकमेकांच्या सहकार्याने शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी एकत्रितपणे व एकमेकांच्या सहकार्यातून उपक्रम राबवीत आहेत. या कार्यक्रमात सहभागी शाळांची संख्या वाढविण्यासाठी राज्यस्तरावरून कार्यवाही करण्यात येत आहे.

६.शैक्षणिक तपासणी व शाळा भेट प्रपत्र (AcdemicInspection&School Visitsformat)
उद्दिष्टे :
1) शाळेत येणा-या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याची खात्री करणे.
2) शाळा भेटी व शैक्षणिक तपासणी दरम्यान शिक्षक व मुख्याध्यापक यांना जाणवणा-या शैक्षणिक अडचणीसोडविण्यासाठी मदत करणे.
3) शालेय घटकांना शैक्षणिक गुणात्मक विकासासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून प्रेरक व आवश्यक सुधारात्मक सहकार्य करणे. मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
4) दिलेल्या सुधारात्मक सूचना व मार्गदर्शन यानुसार झालेल्या कार्य पूर्ततेचे अनुधावन करणे. 
कार्यपद्धती : 
PGI अंतर्गत शैक्षणिक तपासणी व शाळा भेट या दर्शकाचे राज्याचे गुणांकन वाढावे यासाठी संशोधन विभागामार्फत शैक्षणिक तपासणी व शाळा भेट प्रपत्र विकसित करण्यात आलेली आहेत.

७.संशोधन पोर्टल (ResearchPortal)
NCERT,नवी दिल्ली यांचे मार्फत संशोधन पोर्टल विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आलेआहे. यापोर्टलवरराष्ट्रीयआणिराज्यस्तरावरघेण्यातआलेल्या संशोधनाचे सारांश प्रसिद्धकरण्यात येणारआहेत. याकार्यासाठी SCERT आणि DIET यांचेसहकार्यआवश्यकअसणारआहे. यासंशोधनपोर्टलवरसर्वप्रथम, गेल्या 10 वर्षातकरण्यातआलेल्या संशोधनांचे सारांश एकत्रित करण्याचे प्रस्तावितआहे. हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणारआहे. सदरपोर्टलचेकाम पूर्ण करण्यासाठी SCERT स्तरावर संशोधन उपविभाग प्रमुख यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.सदरसमन्वयक NCERT, SCERT आणि DIET यांच्यात समन्वय साधणार आहेत. 
सध्यस्थितीत एकूण २२ संशोधन पेपर NCERT, नवीदिल्ली यांना पाठविण्यात आले आहेत.

८.राज्यसमन्वय समितीबैठक 
Regional Institute Of Education, (RIE) Bhopal ही NCERT, नवी दिल्लीची क्षेत्रीय शिक्षणसंस्था असून वेळोवेळी शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्याबाबतीत प्रयत्नशीलअसते. त्यानुसारराज्यातील शैक्षणिक कार्यालयांकडूनसन२०२०-२१च्या संदर्भाने राज्याच्या शैक्षणिक गरजा मागवून घेऊन RIE, Bhopal यांना सादर केल्या. तसेच दि. २०जानेवारी२०२१रोजी त्यांनी दिलेल्या निकषानुसार गठीत केलेल्या राज्य समन्वय समितीच्या (State co-ordination committee) सभेत महाराष्ट्रराज्याच्या शैक्षणिक गरजांवर चर्चा करण्यातआली. त्यानंतर सदर शैक्षणिक गरजांचा प्रस्ताव तयार करून संस्थेच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ठेवण्यात येतात. यानंतर त्यांच्यामार्फत सदर शैक्षणिकगरजांचापूर्ण करण्यासाठी त्यांच्या स्तरावरून उपक्रम हाती घेतले जातात.
खालील विषयावरील ३ राज्यस्तरीय संशोधने विभागामार्फत पूर्ण.
१. माध्यमिक स्तरावरील इयत्ता नववीतून गळती झालेल्या विद्यार्थ्यांच्या गळतीच्या कारणांचा शोध व उपाययोजना. (सन २०१८-१९)
२. महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील DIKSHA app च्या द्वारे QR कोड वापराच्या सद्यस्थितीचा अभ्यास. (सन २०१८-१९)
३. महाराष्ट्रराज्यातीलशाळांमधीलतंत्रज्ञानविषयकसाधनसुविधांच्याउपलब्धताववापरयाविषयीच्यासद्य:स्थितीचाअभ्यास. (सन २०१९-२०)

९. राष्ट्रीयस्तरावरील संशोधनात सहभाग
NIEPA,नवी दिल्ली स्तरावरील A Critical Assessment of State Level Capacity Building Institutions in Education in Maharashtra या राष्ट्रीयस्तरावरीलसंशोधनातसहभाग घेऊन महाराष्ट्र विषयी माहिती सादर करण्यात आली.

१०.इतर कामे 
१.कृतिसंशोधने - शैक्षणिक वर्ष २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांचे कडून एकूण ५१ कृतिसंशोधन कार्य पूर्ण करण्यात आले आहेत. यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळांतून आवश्यक मार्गदर्शन उपलब्धकरून देण्यात आले. 
२.NAS, ASER व PSM यावरआधारितजिल्हानिहायसंपाद्णुकीचेविश्लेषण व सादरीकरण. वरिष्ठांच्या सूचनेनुसारविविध सादरीकरण तयार करून देण्यात आली.
३.SCERT आसामच्या रिसर्च जर्नल मध्ये The status and challenges of using QR Codes by Teachers through DIKSHA: A Study of Maharashtra या विषयावरील रिसर्च पेपर प्रसिद्ध.
४.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षक- प्रशिक्षकांचे प्रशिक्षण – लोणावळा 
 

फोटो गॅलरी


सन २०२१९-२० : १.वार्षिक कार्य अहवाल २०१८-१९ 

                           २.रिसर्च बुलेटीन 

सन २०२०-२१ : १.वार्षिक कार्य अहवाल २०१९ -२० 

                        २.रिसर्च बुलेटीन

सन २०२१-२२ : १.वार्षिक कार्य अहवाल २०२०-२१

सन २०२२-२३ : १.वार्षिक कार्य अहवाल २०२१-२२ 

सन २०२३-२४ : १.वार्षिक कार्य अहवाल २०२२-२३ 

                        २. जिल्हा शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका