विभागाची स्‍थापना


इंग्रजी भाषा विभाग हा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे समन्वय विभागांतर्गत कार्यरत आहे. या विभागामध्ये डॉ. अजयकुमार फुंदे, अधिव्याख्याता, श्री. अरुण सांगोलकर, वरिष्ठ अधिव्याख्याता आणि डॉ.कमलादेवी आवटे, उपसंचालक तथा प्राचार्य, समन्वय विभाग, हे अधिकारी कार्यरत आहेत. मा. डॉ. शोभा खंदारे, सहसंचालक आणि मा. राहूल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी कामकाज सुरु आहे. शासन निर्णय, दिनांक १७ ऑक्टोबर, २०१६, एस.सी.ई.आर.टी.आणि डाएट पुनर्रचना, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई च्या संदर्भाने इंग्रजी भाषा विभाग हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला.

विभागाची उद्दिष्ट्ये


१. इयत्ता 1ली ते 12वी मधील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेच्या विविध कृती/क्रियाकलाप व शैक्षणिकसाधन सामग्री यांचे नियोजन, विकसन आणि अंमलबजावणी करणे.

२. ई-साहित्य (व्हिडिओ, संदर्भ, आशय इ.) तयार करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देणे.

३. इयत्ता 1ली ते 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी इंग्रजी विषयाचे वेगवेगळे Teaching Learning Material तयार करणे.

४. पर्यवेक्षीय अधिकारी, शिक्षक इत्यादींसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी/नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी करणे.

५. विविध प्रशिक्षण, उपक्रम, साहित्य यांची परिणामकारकता तपासणे आणि सर्व भागधारकांना याविषयी अभिप्राय देणे.

६. इंग्रजी भाषेतील भागधारकांमध्ये स्वारस्य निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम राबविणे.

७.विविध धोरणात्मक आराखडे,कागदपत्रे, पुस्तके भाषांतरित करणे.

८.परिषदेतील इतर विभागांनासहाय्य आणि मदत करणे.

९. नवीन शक्षणिक धोरणाचीअंमलबजावणी करण्यासाठी इंग्रजी भाषा विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम,पाठ्यक्रम निर्मिती करणे.

१०. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मोहिमेच्या अनुषंगाने शिक्षकांची  क्षमता वृद्धी करण्यासाठी सहाय्य करणे.

महत्वाचे शासन निर्णय


विभागाची पद संरचना


अ.क्र. पदाचे नाव मंजूर पद भरलेली पद कार्यरत व्यक्तीचे नाव
१. प्राचार्य तथा उपसंचालक (समन्वय) ०१ ०१ डॉ. कमलादेवी आवटे
२. वरिष्ठ अधिव्याख्याता ०१ ०१ श्री. अरुण सांगोलकर
३. अधिव्याख्याता ०१ ०१ डॉ. अजयकुमार फुंदे
४. विषय सहायक ०१ ०१ पल्लवी इंगोले
५. लिपिक / Data Entry Operator ०१ ०० रिक्त
६. वर्ग-४ शिपाई ०१ ०० रिक्त

विभागातील कामे


अ.क्र. उपक्रमांचे नाव स्तर आर्थिक सहाय्य
१. सेतू अभ्यास (इयत्ता २ री  ते १० वी) स्टार्स प्रकल्प
२. भाषिक कोडे आणि भाषिक खेळपुस्तिका विकसन इयत्ता १ २रि ते ५ वी स्टार्स प्रकल्प
३. स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका विकसन  इयत्ता ५ वी व ८ वी स्टार्स प्रकल्प
४. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) प्रश्नपत्रिकांची  निर्मिती इयत्ता ३ री ते  ८ वी स्टार्स प्रकल्प
५. इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या मोड्युल विकसन ९ वी ते १२ वी समग्र शिक्षा

फोटो गॅलरी