विभागाची स्‍थापना


सन १९६३ साली शिक्षण संचालनालयात मूल्यमापन विभागाची स्थापना झाली.सन १९६८ मध्ये हा विभाग परिषदेत समाविष्ट करण्यात आला. 

विभागाची उद्दिष्ट्ये


१. शाळांतर्गत शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेमधील समस्यांचा अभ्यास करून त्यात सुधारणा सुचविणे .

२. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनासाठी साधनांची व मार्गदर्शक साहित्यांची  निर्मिती करणे .

३. शाळांतर्गत मुल्यमापनासाठी क्षमता/अध्यन निष्पत्ती/कौशल्य  यांवर आधारित चाचण्यांची निर्मिती  करणे.

४. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत गुणात्मकदृष्ट्या सुधारणा घडवून आणण्यासाठी मार्गदर्शक साहित्य निर्मिती करणे .

५. नवीन अभ्यासक्रम क्षमताधिष्टीत अध्ययन - अध्यापन    आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीबाबत राज्य, विभाग, जिल्हा पातळीवरील  मार्गदर्शक यांच्यासाठी प्रशिक्षण  वर्गाचे आयोजन करणे.

६. अध्ययन - अध्यापन प्रक्रिया व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याबाबत धोरण आखण्यासाठी किंवा योग्य दिशा देण्यासाठी विविध चाचण्याद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे. 

महत्वाचे शासन निर्णय


विभागाची पद संरचना


अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे कार्यरत व्यक्तीचे नाव
उपविभाग प्रमुख ०१ ०१ श्रीम.संगीता शिंदे
अधिव्याख्याता - ०१ श्रीम.स्वाती पेटकर (अतिरिक्त कार्यभार)
विषय सहाय्यक - ०१ श्रीम.अनुराधा चव्हाण
मूल्यमापन कक्ष प्रतिनिधी १६ श्री.उमेश देशमुख
श्री.तौसीफ परवेज
लिपिक ०१ - -
शिपाई ०१ श्री.साळुंखे

विभागातील कामे


वर्षभरात विभागाने राबविलेल्या सर्व उपक्रमाची (प्रशिक्षण/ कार्यशाळा) यादी.

अ.क्र. उपक्रमाचे नाव स्तर (इ. १ ली ते ५, ६ ते ८, ९ ते १०) आर्थिक सहाय्य (समग्र शिक्षा, शिक्षक प्रशिक्षण, राज्य निधि, विना अर्थ सहाय्य)
CCE प्रशिक्षण १ ली ते ८ वी STAR
HPC १ ली ते ८ वी STAR
PAT ३ री ते ८ वी STAR
SEAS सर्वेक्षण ३, ६ , ९ या इयत्ता STAR
मूल्यमापन कक्ष निर्मिती * STAR
ITEM bank निर्मिती ( शिक्षक पर्व अंतर्गत १ ली ते १० वी निरंक
परीक्षा पे चर्चा अंतर्गत विविध स्पर्धा ६ वी ते १० वी STAR

उपक्रमाचे नाव :- १) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) घटक संच विकसन व शिक्षक

उपक्रमाची उद्दिष्ट्ये :-

  • राज्यातील तज्ज्ञ शिक्षकांचा कार्यबळ गट तयार करणे.
  • केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य तो बदल करणे.
  • राज्यासाठी केंद्राच्या सुचनेनुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती विकसित करणे.
  • राज्यस्तर तज्ज्ञांमार्फत विकसित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचे राज्यातील सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे.
  • विद्यार्थ्यांचे नियतकालिक व सातत्यपूर्ण मूल्यमापन करणे साठी शिक्षकांना सक्षम बनविणे.
उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप
  • सदर उपक्रमांतर्गत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) घटक संच विकसन व बदल पूर्ण झाला.
  • त्यावर आधारित तालुका व जिल्हा स्तर प्रशिक्षण घेण्यात आले.
  • कार्यशाळमध्ये नवीन शैक्षणिक धोरणनुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) घटक संचमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
उपक्रमाची सांख्यिकीय तपशील :-
अ.क्र. उपक्रमाचे नाव स्तर उपक्रमाचा कालावधी सहभागी घटक/ लाभार्थी सहभागी संख्या प्राप्त निधी खर्च निधी आर्थिक सहाय्य
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) घटक संच विकसन व शिक्षक प्रशिक्षण प्राथमिक २०२३-२४ शिक्षक ३२५००० ११५४.४६ STAR
उपक्रमाची फलनिष्पत्ती :-

बदलत्या परिस्थिती नुसार झालेले बदल शिक्षकांपर्यंत पोहचविण्यास सहाय्यभूत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) प्रशिक्षण अंदाजे ३२५००० लक्ष शिक्षकाना देण्यात आले आहे. ज्या आधारे शिक्षकाना मूल्यमापन करताना सुलभता प्राप्त होईल.

२) उपक्रमाचे नाव :- मा. पंतप्रधान महोदय यांचेसमवेत इयत्ता ६ वी ते 12 वी चे विद्यार्थ्यांशी परीक्षे पे चर्चा - 6

उपक्रमाची उद्दिष्ट्ये :-

  • विद्यार्थ्यांवर परीक्षांचा असलेला ताणतणाव कमी करणे.
  • विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे.
उपक्रमाच्या कार्यवाहीचे स्वरूप (मुद्देनिहाय माहिती द्यावी)
  • मा. पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी हे “ परीक्षा पे चर्चा - 6” या कार्यक्रमांतर्गत इयत्ता ६ वी ते १२ वीच्या निवडक विद्यार्थी (०२) समवेत फेब्रुवारी २०२३ मध्ये संवाद साधला.
  • निवडक २०२ विद्यार्थ्यांना मा.संचालक NCERT, नवी दिल्ली यांचेमार्फत एक विशेष PPC कीट देण्यात आले कि ज्यामध्ये मा. पंतप्रधान महोदयांनी लिहिलेल्या हिंदी व इंग्रजी मधील परीक्षा योद्धा पुस्तकाचा समावेश आहे ते प्रदान करण्यात आले.
उपक्रमाची सांख्यिकीय तपशील :- इयत्ता ९ वी ते १० वी सर्व विद्यार्थी
अ.क्र. उपक्रमाचे नाव स्तर उपक्रमाचा कालावधी सहभागी घटक/ लाभार्थी सहभागी संख्या प्राप्त निधी खर्च निधी आर्थिक सहाय्य
मा. पंतप्रधान महोदय यांचेसमवेत इयत्ता ६ वी ते 12 वी चे विद्यार्थ्यांशी परीक्षे पे चर्चा - 6 उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक २०२३-२४ शिक्षक २०२ STAR
उपक्रमाची फलनिष्पत्ती :- विद्यार्थ्याना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठासमोर आपल्या अडचणी मांडण्यात आल्या.

फोटो गॅलरी