विभागाची स्‍थापना


शालेय शिक्षण व  क्रीडा विभाग, शासन निर्णय  क्र. डायट ४५१६/(४०/१६) /प्रणशक्षि, दि.१७ /१०/२०१६ अन्वये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण  परिषद,  पुणे ची पुनर्रचना करण्यात आली असुन राज्यस्तरावर पुर्वी अस्तिअत्वार असलेल्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक  संशोधन प्रशिक्षण  परिषदची पुनर्रचना करुन ग्रंथालयाची स्थापना करण्यार आली.

विभागाची उद्दिष्ट्ये


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग :
१. शासन निर्णय क्र. डायट ४५१६/(४०/१६) / प्रशिक्षण, दि.१७ /१०/२०१६
२. शासन निर्णय क्र.-आबांध 2017/प्र.क्र.41/17/प्रशा-5 , दि.३१/०७/२०१७
३. शासन निर्णय क्र.डायट ४५१६/(४०/१६) / प्रशिक्षण, दि.१७/१२/२०१८
वरील शासन निर्णयनुसार ग्रंथालयाची विभागाची पद संरचना-

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पद भरलेली पद कार्यरत कर्मचाऱ्यांचे नाव शेरा
ग्रंथपाल जाधव एस.एस मुळ कार्यभार
सहा.ग्रंथपाल मेहेत्रे ए.एन मुळ कार्यभार
लिपिक /डेटा एंट्री आपरेटर - -
शिपाई श्री. सुभाष निगडे मुळ कार्यभार

महत्वाचे शासन निर्णय


विभागाची पद संरचना


१) महाराष्ट्‍ शासनाच्या शालेय शिक्षण विषयक धोरणाची अमलबजावणी करणेची जबाबदारी या कार्यालयावर आहे. त्या अनुषंगाने विविध विषयाच्या शैक्षणिक साहित्‍य निर्मिती करिता संदर्भ साहित्याची खरेदी करणे व गरजेनुसार सर्व विभागाना उपलब्ध करुन देणे.

२)  शैक्षणिक  मासिके खरेदी करुन शिक्षण प्रवाहाविषयी अद्ययावत माहिती उपलब्ध करुन देणे

३)  मराठी आणि इंग्रती वृत्‍तपत्रातून प्रसिध्‍द होणा-या शैक्षणिक वृत्‍तांचा संग्रह करून वरिष्‍ठ अधिकारी संदर्भासाठी/ माहितीसाठी उपलब्‍ध करून देणे.

विभागातील कामे


ग्रंथपाल :

  1. ग्रंथालयाचे व्यवस्थापन, प्रशासन व ग्रंथाचे पारेषन करणे.
  2. ग्रंथालयातील सर्व पुस्तके, नियतकालिके याची यादी व माहिती अद्ययावत ठेवणे
  3. पुस्तके खरेदीबाबत प्राधिकरणातील सर्व विभागाकडून  आणि अधिकारी यांच्याकडून उपयुक्त पुस्तकांची यादी मागवीणे
  4. नोंदणी केल्याप्रमाणे संदर्भ  ग्रंथ, शैक्षणिक व इतर विषयांशी निगडीत पुस्तकांची मागणी करणे. यादीप्रमाणे पुस्तके व संदर्भ  ग्रंथाची अवलोकनार्थ मागवीणे
  5. पुस्तके खरेदीबाबत निवड समितीची बेठक आयोजित करून अंतिम पुस्तक निवड करणे
  6. नवीन पुस्तके, नियतकालिके खरेदीबाबत नियोजन करणे
  7. पुस्तके खरेदीची कार्यवाही करणे
  8. नवीन पुस्तके, संदर्भ ग्रंथ, शैक्षणिक व इतर साहित्य दाखलनोंद वहीमध्ये आणि संगणकावर ई-ग्रंथालयात नोंद करणे.
  9. नवीन पुस्तके, संदर्भ ग्रंथ, शैक्षणिक व इतर साहित्य यांचे वर्गीकरण आणि तालीकीकरण करणे वर्गीकरण आणि तालीकीकरण करणे
  10. शिक्षणतज्न, प्रशिक्षणर्थी,अधिकारी यांना मागणीनुसार पुस्तके/नियतकालिके उपलब्ध करून देणे
  11. ग्रंथालयातील सर्व कर्मचा-यावर नियत्रण ठेवणे
  12. विविध प्रसंगानुसार ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणे

खालील ग्रंथालय सेवा देणे-

  1. संदर्भ सेवा
  2. वर्तमानपत्रातील शिक्षणविषयक माहिती परिषदेतील अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे
  3. शिक्षणतज्न, प्रशिक्षणर्थी,अधिकारी यांना मागणीनुसार संदर्भ सेवा देणे
  4. संदर्भ ग्रंथ आवश्यकते नुसार  फोटोकॉपी करून घेण्यास उपलब्ध करून देणे
  5. Digital Reference service 
  6. शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या  Ph.D/ M.Phil च्या विद्यार्थ्यांना संदर्भ सेवा देणे.
  7. शिक्षण खात्यातील विविध विभागस आवश्यकतेनुसार पुस्तके उपलब्ध करून देणे.
  8. शिक्षणतज्न, प्रशिक्षणर्थी,अधिकारी आणि बह्यावाचाकाना सभासदत्व व सेवा देणे.
  9. इ. १ली. ते १२वी. चा अभ्यासक्रम निर्मिती करिता संदर्भसेवा देणे.
  10. मूल्यमापन विभागस पायाभूत व संकलीत चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका निर्मिती करिता संदर्भ साहित्य देणे

सहा.ग्रंथपाल :

  1. पुस्तके, नियतकालिके याची आवश्यकते नुसार देवघेव करणे.
  2. वाचकांनी परत केलेली पुस्तके कपाटात ठेवणे.
  3. ग्रंथापालाच्या व ग्रंथालय लिपिकाच्या अनुपस्थितीत त्याची कामे पार पाडणे.
  4. ग्रंथालयात येणा-या वर्तमानपत्र आणि नियतकालिके याची  नोंद करणे.
  5. वाचकांनी परत न केलेली पुस्तकांची यादी करणे.
  6. नियतकालिकाचे गठ्ठे बांधून ठेवणे.
  7. फाटलेली खराब झालेली पुस्तके दुरुस्त करणे.
  8. ग्रंथालयात आवश्यकते नुसार ग्रंथालयीन कामात मदत करणे.
  9. पुस्तकाची स्वच्छता करून घेणे.
  10. ग्रंथपालाच्या आदेशाचे पालन करणे.
  11. लिपिक /डेटा एंट्री आपरेटर :
  12. टिपणी / प्रस्ताव / पत्रव्यवहार इ.बाबींची कार्यवाही करणे.
  13. नियतकालिकांच्या वर्गणी अदा करणे, अप्राप्त अंकाबाबत पत्रव्यवहार करणे.
  14. ग्रंथ / मासिकांची सूची करणे.
  15. पुस्तकांची / वाचन साहित्याची संगणकावर नोंद करणे, दाखलनोंद वहीमध्ये नोंद घेणे.
  16. नवीन सभासदांची नोंदणी प्रक्रिया करणे.
  17. सभासद वर्गणी /अनामत रक्कम याचा हिशोब ठेवणे.
  18. ग्रंथालयात आवश्यकते नुसार ग्रंथालयीन कामात मदत करणे.
  19. पुस्तक खरेदीची देयके आणि इतर आर्थिकबाबींची पूर्तता करणे.
  20. वार्षिक खर्च आणि वेळोवेळी घेतलेली अग्रीम रकमेचा हिशोब ठेवणे.
  21. ग्रंथपालाच्या आदेशाचे पालन करणे.

शिपाई :

  1. ग्रंथालय इमारतीची अंतर्गत देखभाल.
  2. पुस्तकांची स्वच्छता व देखभाल 
  3. ग्रंथालयातील फर्निचर (टेबल,खुर्ची व कपाटे) यांची स्वच्छता करणे.
  4. पुस्तकांची लेबलींग आणि शिक्के मारणे.
  5. वर्तमानपत्राचे व्यवस्थापन करणे.(शिक्के मारणे,स्टँडवर लावणे, महिन्याचे गठ्ठे बांधने ) 
  6. पुस्तके,नियतकालिके याची आवश्यकते नुसार कपाटातून काढून आणने.
  7. वाचकांनी परत केलेली पुस्तके कपाटात ठेवणे.
  8. ग्रंथालयात आवश्यकते नुसार ग्रंथालयीन कामात मदत करणे.
  9. ग्रंथपालाच्या आदेशाचे पालन करणे.

LIBRARY SERVICES:

  1. Reference Service
  2. Digital educational news clipping Service
  3. Current content Service
  4. SDI Service (Selective Dissemination of Information services)
  5. Bibliographical Service
  6. Photo copying Service
  7. Online search (educational and other references)
  8. Digital reference Service
  9. Educational learners (PhD and M.Phil student)
  10. External membership of educational Expert 
  11. Inter Library loan Services 

फोटो गॅलरी