Accessibility Tools

Text-to-Speech

Currently reading:

State Council of Educational Research and Training, Maharashtra

आय.टी. विभाग - संरचना, उद्दिष्टे, उपक्रम | SCERT Maharashtra

आय.टी. विभाग

विभागाची स्थापना :-

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेंतर्गत दि. १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार आयटी व प्रसारमाध्यम विभागांतर्गत आयटी विभागाची स्थापना करण्यात आली.

विभागाची संरचना / पदसंरचना :-

पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
उपसंचालक (आय.टी व प्रसारमाध्यम) 1 1
वरिष्ठ अधिव्याख्याता 1 0
अधिव्याख्याता 1 1
अधिक्षक गट ब 1 1
लिपिक /डाटा एन्ट्री ऑप. 2 0
विषय सहायक 2 0
कंत्राटी नियुक्तीने(CSR) 1 0
शिपाई 2 1

विभागाची उद्दिष्टे व कार्य :-

  1. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे चे संकेतस्थळ अद्ययावत ठेवण्याचे व्यवस्थापन पाहणे.
  2. दीक्षा प्रणाली अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे शैक्षणिक साहित्याचे व्यवस्थापन पाहणे.
  3. महाराष्ट्र राज्याच्या एकूण पाच पीएमई विद्या वाहिन्यांचे व्यवस्थापन पाहणे.
  4. राज्यातील शिक्षकांच्या आय.सी.टी कौशल्यांचे सक्षमीकरण करणे.
  5. शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरासाठी शिक्षकांना प्रोत्साहन पर उपक्रम आयोजित करणे.
  6. राज्यातील शिक्षकांचे तंत्रज्ञान आधारित अध्यापन कौशल्य समृद्ध करण्यासाठी काम करणे.
  7. परिषदेच्या एस सी इ आर टी महाराष्ट्र या youtube चॅनलचे व्यवस्थापन पाहणे.
  8. राज्यातील शिक्षकांच्या आय.सी.टी कौशल्यांचे सक्षमीकरणासाठी विविध कार्यशाळा व प्रशिक्षणे घेणे.
  9. अशासकीय संस्थांचे प्रस्ताव छाननी करुन गाभा समितीसमोर सादर करणे.

विभागाचे उपक्रम :-

  1. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विभागाने स्टार प्रकल्प अंतर्गत राज्यातील पाच पीएमई विद्या वाहिन्यांसाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या महत्त्वाच्या सर्व विषयांसाठी 2560 व्हिडिओंची निर्मिती केली आहे.
  2. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये स्टार प्रकल्प अंतर्गत इयत्ता चौथी व पाचवीच्या सर्व विषयांसाठी मिळून सामान्य विद्यार्थ्यांसाठी 500 व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयएसएल आधारित पाचशे असे एकूण 1000 व्हिडिओ निर्मिती करून दीक्षा प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  3. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये आयसीटी आधारित अध्यापनशास्त्र या विषयावर दर रविवारी युट्युब वर वेबिनार मालिका घेण्यात आली.
  4. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये स्टार प्रकल्प अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीच्या सर्व विषयांसाठी मिळून एकूण 1000 व्हिडिओ निर्मिती करून दीक्षा प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  5. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा घेण्यात आली.
  6. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे या संस्थेमध्ये एकूण 27 तज्ञ अधिकारी व शिक्षकांना स्मार्टफोनच्या माध्यमातून शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीसाठी प्रशिक्षण देण्यात आले.
  7. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये PMSHRI प्रकल्प अंतर्गत एकूण ६ ऑनलाईन कोर्स निर्मिती करण्यासाठी परिषदेत घटकसंच विकसन कार्यशाळा घेण्यात आली.

उपक्रम/संलग्नता


सूचना

आपण maa.ac.in या संकेतस्थळाच्या बाहेर जात आहात. पुढे जायचे आहे का?

होय, पुढे जा