Accessibility Tools

Text-to-Speech

Currently reading:

प्रसार माध्यम विभाग

विभागाची स्थापना

“राज्य शिक्षणशास्त्र संस्था”म्हणून परिषदेची स्थापना १९६४ मध्ये झाली. तेव्हा प्रकाशन विभाग हा स्वतंत्र विभाग कार्यरत होता. या विभागाचे मुख्य कार्य म्हणजे जीवन शिक्षण मासिकाची निर्मिती, छपाई व शाळांना वितरण हे होते. त्यामुळे या विभागास “जीवन शिक्षण” असे म्हटले जात होते. शासन निर्णय, दिनांक १७ ऑक्टोबर, २०१६, एस.सी.ई.आर.टी. आणि डाएट पुनर्रचना, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई च्या संदर्भाने जीवन शिक्षण विभागाचे नाव “प्रसारमाध्यम विभाग” असे ठेवण्यात आले.

जीवन शिक्षण: शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र

१९ व्या शतकात सुरु झालेले शिक्षक, पालक व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात मार्गदर्शक ठरणारे व शिक्षण आणि शिक्षणासाठीच वाहिलेले महाराष्ट्रातील पहिले मासिक म्हणजे “जीवन शिक्षण”. शिक्षण क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे बघत आलेल्या या मासिकाचे जुने अंक जर आपण चाळले तर १९ व्या शतकापासून शिक्षण प्रत्येक महिन्यागणिक कसे बदलत गेले याची विस्तृत माहिती या अंकांच्या पानापानातून आपल्याला वाचायला मिळतो.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "जीवन शिक्षण" मासिकाचे प्रकाशन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेच्या प्रसारमाध्यम विभागामार्फत केले जाते. शासनाचे ध्येय धोरणे व प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आणि अपेक्षित शालेय स्तरावरील अंमलबजावणी व परिणाम यांच्यातील दुवा म्हणून हे मासिक कार्यरत आहे. या मासिकाला १६३ वर्षाची गौरवशाली व वैभवशाली परंपरा असून मासिकाची रचना, नाविन्यपूर्णता आणि आकर्षक मांडणी इत्यादी गुणवैशिष्ट्यामुळे राज्यभरातील अधिकारी व शिक्षक वर्गाचे हे आवडते मासिक ठरले आहे.

१ राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांना देण्यात येणाऱ्या चार टक्के सादिलवार खर्चातून जवळपास ६०,००० शाळांना या मासिकाचे दरमहा मोफत वितरण करण्यात येते. याच सोबत वर्गणीदारांना आणि देणगीदारांना हा अंक पोस्टामार्फत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. सद्यस्थितीमध्ये या मासिकाची वार्षिक वर्गणी ३०० रुपये असून प्रत्येक अंकाची किंमत रुपये ३० इतकी आहे.

ब्रिटिश कालखंडात संस्कृत शिक्षण देणारे कॉलेज १८२१ मध्ये पुणे येथे सुरू केले व पुढे त्याचे शिक्षक प्रशिक्षण केंद्रामध्ये (पुणे कॉलेज) रूपांतर झाले. त्याच कॉलेजने मे १८६१ मध्ये पुना कॉलेज स्कूल पेपर म्हणजेच "पाठशाला पत्रक" हे २४ पृष्ठांचे व २ रु. किंमत असलेले नियतकालिक सुरू केले. पुना नॉर्मल स्कूलचे सुप्रीटेंडंट श्रीकृष्णशास्त्री तळवेकर हे या पत्रिकेचे आद्य संपादक होत. पुढे १८६३ पासून केरो लक्ष्मण छत्रे या संपादकांनी "मराठी शाळा पत्रक" असे त्याचे नाव बदलले. तदनंतर कॉलेजचे प्राचार्य कृष्णशास्त्री चिपळूणकर हे या मासिकाचे संपादक झाले. त्यांनी या मासिकाचे स्वरूप बदलवून इंग्रजी, संस्कृत मधील विद्वत्तापूर्ण निबंध, विवेचने इत्यादी छापण्यास सुरुवात केली. पण मराठी लेखनास दिशा देणारे हे मासिक काही कारणास्तव १८७५ मध्ये बंद पडले. १८९० मध्ये रामचंद्र भिकाजी जोशी या संपादकांनी चित्रशाळा प्रेस मार्फत बरीच वर्षे हे मासिक चालवले. मात्र जुलै १९११ मध्ये ट्रेनिंग कॉलेजकडे हे मासिक सुपूर्द करण्यात आले.

कालांतराने "मराठी शिक्षक" असे नाव देण्यात आले. पुढे सन १९२८ मध्ये या मासिकाचे नाव "प्राथमिक शिक्षण" असे झाले. ग. ह. पाटील हे ट्रेनिंग कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य असताना म्हणजेच सन १९५६ पासून या मासिकाचे नाव "जीवन शिक्षण" असे ठेवण्यात आले. महात्मा गांधीजींच्या जीवन शिक्षण या विचारापासून प्रेरणा घेऊन जीवन शिक्षण हे नाव देण्यात आले ते आज तागायत त्याच नावाने प्रकाशित केले जाते.सुरुवातीस कॉलेजचे प्राचार्य हे संपादक होते, तदनंतर सन १९६४ मध्ये "राज्य शिक्षणशास्त्र संस्था" स्थापन झाल्यानंतर संपादकीय कार्याची जबाबदारी तत्कालीन पदसिद्ध संचालक डॉ. चित्रा नाईक यांचेवर सोपवण्यात आली. तेव्हापासून जीवन शिक्षण मासिकाचे संपादक हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथील मा. संचालक हे आहेत.अनुताई वाघ,इंदुमती शिरवाडकर, एस. एम. जोशी, प्रा.बोकील प्रा. वसंत देसाई, यदुनाथ थत्ते यासारख्या दिग्गज लेखकांच्या लेखणीने समृद्ध झालेले हे मासिक अजूनही प्रत्येक शिक्षकाला तेवढेच हवेहवेसे वाटते. पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी व शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेसाठी राबवीत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांचे अनुभव या मासिकामध्ये शब्दबद्ध करून नियमित पाठवीत असतात. शाळांमध्ये विद्यार्थी ज्या काही कृती करतात त्यांची क्षणचित्रे सुद्धा अंकात छापले जातात.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ही राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यरत असणारी एक प्रमुख शिखर संस्था (Academic Wing) आहे. १९६४ साली स्थापन झालेली ही संस्था शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणे, शालेय अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक संशोधने, अध्ययन अध्यापन साधनांची निर्मिती, विविध प्रकाशने यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय आहे.

जीवन शिक्षण हे मासिक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या जीवन कौशल्यांवर आधारित आहे. जीवन शिक्षणच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापन, संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, समस्या सोडवणे, सर्जनशीलता आणि संघकार्य यांसारख्या कौशल्यांचा विकास करण्यावर भर दिला जातो. ही कौशल्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

जीवन शिक्षण मासिकाच्या माध्यमातून शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असलेल्या तंत्रांची माहिती मिळते. हे मासिक शिक्षकांना लत्यांच्या अध्यापन प्रक्रियेत जीवन कौशल्यांचा समावेश कसा करावा याबाबत मार्गदर्शन करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव अधिक समृद्ध होतो.शिक्षणक्षेत्रातील नवनवीन तंत्रे, पद्धती, विचार, कल्पना, संशोधने इत्यादी बाबत शिक्षक व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी यांना अद्यावत माहिती पुरवून त्यांची क्षमता वृद्धी केली जाते. तसेच नवनवीन विषयासंदर्भात दरवर्षी ह्या मासिकाचे काही विशेषांक काढण्यात येतो.

कोविड कालावधीमध्ये सुद्धा हा अंक कोणताही खंड न पडता सुरळीत सुरू होता.सद्यस्थितीत हे मासिक चालवण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे एक प्रकाशन सल्लागार समिती अस्तित्वात असून समितीचे अध्यक्ष मा. राहूल रेखावार ( भा.प्र. से.) संचालक, कार्यकारी संपादक म्हणून सहसंचालक श्रीम. अनुराधा ओक, सहसंपादक म्हणून उपसंचालक श्रीम. ज्योती शिंदे, समिती सदस्य म्हणून उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे,डाएट प्राचार्य प्रतिनिधी श्री.नामदेव शेंडकर, सहा. संचालक श्री. हरीश बोरावके, वरिष्ठ अधिव्याख्याता सचिन चव्हाण यांचा समावेश आहे. याचबरोबर संपादन मंडळ सदस्य म्हणून श्री. श्रीकांत चौगुले, श्री. सलील वाघमारे,श्री. अजित राक्षे श्री. संजय जगताप कार्यरत असून प्रसारमाध्यम विभागाचे विभागप्रमुख, समितीचे सदस्य सचिव तथा मासिकाचे संपादक म्हणून श्री. अरुण सांगोलकर कामकाज पाहत आहेत.एकूणच, 'जीवन शिक्षण' मासिक विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्यांच्या विकासासाठी आणि शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांच्या वृद्धीसाठी एक प्रभावी साधन आहे.

जीवन शिक्षण - विशेष प्राप्ती

जीवन शिक्षण या मासिकाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचेकडून मासिकाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि १६१ वर्षांच्या प्रदीर्घ परंपरा आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासाठी समितीने या मासिकाच्या ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे मूल्यमापन करून स्व. जानकीबाई केळकर स्मृती पुरस्काराचे देऊन गौरविण्यात आले. या पुरार्स्काराचे स्वरूप हे रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे होते. हा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक मा. राजन खान, मा.प्रा. मिलिंद जोशी आणि वि.दा. पिंगळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या मासिकाचा सन्मान स्वीकारण्यासाठी मा. डॉ.नेहा बेलसरे, उपसंचालक,मा. कमलादेवी आवटे, उपसंचालक, मा. नामदेव माळी, सहा.संचालक ,मा. दिपक माळी,प्रशासन अधिकारी ,सलील वाघमारे, तत्कालीन अधीक्षक आणि श्री. अरुण सांगोलकर, प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

प्रकाशन सल्लागार समिती :

अ.क्र. नाव पदनाम समितीमधील पद
१. श्री. राहूल रेखावार (भा. प्र. से.) संचालक अध्यक्ष
२. श्रीम. अनुराधा ओक सहसंचालक कार्यकारी संपादक
३. श्रीम. ज्योती शिंदे उपसंचालक सहसंपादक
४. डॉ. कमलादेवी आवटे उपसंचालक सदस्य
५. श्री. नामदेव शेंडकर प्राचार्य, डायट, पुणे सदस्य
६. श्री. हरीश बोरावके सहाय्यक संचालक (लेखा) सदस्य
७. श्री. सचिन चव्हाण वरिष्ठ अधिव्याख्याता सदस्य
८. श्रीम. अपर्णा शेंडकर अधीक्षक सदस्य
९. श्री. अरुण सांगोलकर वरिष्ठ अधिव्याख्याता सदस्य-सचिव तथा संपादक

१. संपादन मंडळ :

अ.क्र. नाव पदनाम मंडळातील पद
१. श्री. श्रीकांत चौगुले मुख्याध्यापक सदस्य
२. श्री. सलील वाघमारे सेवानिवृत अधीक्षक सदस्य
३. श्री. अजित राक्षे शिक्षक सदस्य
४. श्री. संजय जगताप शिक्षक सदस्य

Photo 1 Photo 2
Photo 3 Photo 4

२. विभागाची पदसंरचना :

अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे
१. उपसंचालक 01 01
२. वरिष्ठ अधिव्याख्याता 01 01
३. अधिव्याख्याता 01 00
४. अधीक्षक 01 01
५. विषय सहायक 01 00
६. लिपिक / डाटा एन्ट्री ऑपरेटर 03 02
७. कंत्राटी नियुक्तीने शासनाबाहेरील लोकांना सीएसआर च्या मदतीने 01 00
८. वर्ग ४ 01 00
एकूण 10 05

३. महत्त्वाचे शासन निर्णय :

अ. क्र. तपशील शासन निर्णय
1. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: डायट ४५१६/(४०/१६)/ प्रशिक्षण दिनांक : १७ ऑक्टोंबर, २०१६
2. ई-निविदा उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक: भांखस-२०१४/प्र.क्र.८२/ भाग-III/उद्योग-४ दिनांक: ६ डिसेंबर, २०१६
3. जीवन शिक्षण मासिकाची वार्षिक वर्गणी वाढ करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१२५/ प्रशिक्षण दिनांक: १० डिसेंबर २०१८
4. शैक्षणिक पुस्तके, साहित्य, ई-साहित्य, लघुचित्रपट, चित्रपट परीक्षण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.२५/ प्रशिक्षण दिनांक: ५ मार्च २०२०
5. शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: राप्रधो ४२१५/(३८/१५)/ प्रशिक्षण दिनांक: २४ जुलै, २०१७
6. महाराष्ट्रातील वाचन चळवळ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२३/प्र.क्र.३६०/एसडी-४ दिनांक: २२ नोव्हेंबर, २०२३

४. विभागाची उद्दिष्टे/कार्ये :

  1. जीवन शिक्षण मासिक व इतर प्रकाशनाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील नवीन तंत्रे, विचार, कल्पना, संशोधन इ. बाबत माहिती शिक्षक व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी यांच्यापर्यंत पोहचविणे.
  2. दैनंदिन अध्यापनातील समस्यांबाबत प्राथमिक शिक्षकांना सहाय्य करून मार्गदर्शन करणे.
  3. शिक्षक राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्यात सर्वदूर पोहचविणे.
  4. बदलती शिक्षणाची धोरणे, मूल्यांकन पद्धती, शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम इ. बाबतची माहिती शाळा व शिक्षकांपर्यंत पोहचविणे.
  5. शिक्षकांना वाचनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
  6. समग्र शिक्षा व PM SHRI अंतर्गत ग्रंथालय पुस्तके विकसित करून ती शाळांना उपलब्ध करून देणे.
  7. शाळांमधून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
  8. चित्रपट निर्मात्यांकडून / शासनाकडून प्राप्त झालेल्या चित्रपटांचे शैक्षणिक दृष्टिकोनातून सूक्ष्म परीक्षण करून चित्रपट निर्माते / शासनास अहवाल सादर करणे.
  9. खाजगी निर्मात्यांकडून निर्मित केलेल्या छापील साहित्य (पुस्तके, मासिके इ.), ई-साहित्य, शैक्षणिक साहित्य संच / कार्ड्स / पोस्टर्स / खेळ इ. चे शैक्षणिक दृष्टिकोनातून सूक्ष्म परीक्षण करून खाजगी निर्माते / कंपन्या / शासनास अहवाल सादर करणे.
  10. समाज माध्यमांमार्फत शालेय शिक्षण क्षेत्रातील घडामोडी सर्वदूर पोहोचविणे.

शैक्षणिक वर्षनिहाय प्रसारमाध्यम विभागामार्फत राबविण्यात आलेले विविध कार्यक्रम/उपक्रम :

अ.क्र. वर्ष तपशील
1 २०२१-२२ जीवन शिक्षण मासिकाची निर्मिती
वाचनयात्री
शगून पोर्टलसाठी सर्वोत्तम शैक्षणिक उपक्रमांचे दस्तऐवजीकरण
Teacher Talk
Parents Talk
2 २०२२-२३ जीवन शिक्षण मासिकाची निर्मिती
चित्रपट/लघुचित्रपट तपासणी / परीक्षण
ई-साहित्य, छापील साहित्य, पुस्तके तपासणी / परीक्षण
3 २०२३-२४ जीवन शिक्षण मासिकाची निर्मिती
महाराष्ट्रातील वाचन चळवळ
समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रमासाठी पुस्तकांची छपाई व शाळांना वितरण:
- इयत्ता १ ते ५ साठी: मराठी ५४, उर्दू ४२ पुस्तके
- इयत्ता ६ ते ८ साठी: मराठी १४, उर्दू २, हिंदी २, इंग्रजी २ पुस्तके
- इयत्ता ९ ते १० साठी: मराठी १० पुस्तके
एकूण पुस्तके – १२६
चित्रपट/लघुचित्रपट तपासणी / परीक्षण (१२ चित्रपट)
ई-साहित्य, छापील साहित्य, पुस्तके तपासणी / परीक्षण (१०९ पुस्तके)
सोशल मिडीयाचा प्रभावी वापर
४. २०२४-२५ जीवन शिक्षण मासिकाची निर्मिती

समग्र शिक्षा योजने अंतर्गत ग्रंथालय पुस्तकांची निर्मिती, छपाई आणि वितरण (चार माध्यमे - मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी)
- इयत्ता १ ते ३ साठी पुस्तक संख्या: ५६
- इयत्ता ४ ते ५ साठी पुस्तक संख्या: ४५
- इयत्ता ६ ते ८ साठी पुस्तक संख्या: ४६
- इयत्ता ९ ते १० साठी पुस्तक संख्या: १९
- इयत्ता ११ ते १२ साठी पुस्तक संख्या: ०९
एकूण पुस्तके: १७५

PMSHRI योजने अंतर्गत ग्रंथालय पुस्तकांची निर्मिती, छपाई आणि वितरण (चार माध्यमे - मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी)
- इयत्ता १ ते ३ साठी पुस्तक संख्या: ६
- इयत्ता ४ ते ५ साठी पुस्तक संख्या: ५
- इयत्ता ६ ते ८ साठी पुस्तक संख्या: ३१
- इयत्ता ९ ते १० साठी पुस्तक संख्या: ०९
- इयत्ता ११ ते १२ साठी पुस्तक संख्या: ०४
एकूण पुस्तके: ५५

चित्रपट/लघुचित्रपट तपासणी / परीक्षण
ई-साहित्य, छापील साहित्य, पुस्तके तपासणी / परीक्षण
सोशल मिडीयाचा प्रभावी वापर


शैक्षणिक साहित्य/मासिके/पुस्तके
शैक्षणिक वर्षनिहाय प्रसारमाध्यम विभागामार्फत राबविण्यात आलेले विविध कार्यक्रम/उपक्रम :

अ.क्र. वर्ष तपशील डाउनलोड
१. २०२1-22 जीवन शिक्षण मासिक
२. २०२२-२३ जीवन शिक्षण मासिक
३. २०२३-२४ जीवन शिक्षण मासिक
महाराष्ट्रातील वाचन चळवळ पुस्तिका
समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रमासाठी पुस्तकांची छपाई व शाळांना वितरण
- इयत्ता १ ते ५ साठी मराठी ५४ आणि उर्दू ४२ पुस्तके
४. २०२४-२५ जीवन शिक्षण मासिक

समग्र शिक्षा योजने अंतर्गत ग्रंथालय पुस्तकांची निर्मिती, छपाई आणि वितरण
(चार माध्यमे - मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी)
- इ. १ ते ३ : ५६ पुस्तके
- इ. ४ ते ५ : ४५ पुस्तके
- इ. ६ ते ८ : ४६ पुस्तके
- इ. ९ ते १० : १९ पुस्तके
- इ. ११ ते १२ : ०९ पुस्तके
एकूण: १७५ पुस्तके

PMSHRI योजने अंतर्गत ग्रंथालय पुस्तकांची निर्मिती, छपाई आणि वितरण
- इ. १ ते ३ : ६ पुस्तके
- इ. ४ ते ५ : ५ पुस्तके
- इ. ६ ते ८ : ३१ पुस्तके
- इ. ९ ते १० : ०९ पुस्तके
- इ. ११ ते १२ : ०४ पुस्तके
एकूण: ५५ पुस्तके

विभागाची परिपत्रके :

  पत्र Open
  परिपत्रक Open

फोटो :

वाचनयात्री (2021-22)

शगून पोर्टलसाठी सर्वोत्तम शैक्षणिक उपक्रमांचे दस्तऐवजीकरण(2021-22)

Teacher talk(2021-22)

जीवन शिक्षण -विशेष प्राप्ती (२०२२-२३)

जीवन शिक्षण मासिकास महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्याकडून दि.१३ मार्च २०२३ रोजी कै. जानकीबाई केळकर स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट बालवाड्मय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.



जीवन शिक्षण विशेषांक (२०२२-२३)

जीवन शिक्षण विशेषांक (२०२3-२4 )

महाराष्ट्रातील वाचन चळवळ(२०२३-२४)

समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रमासाठी पुस्तकांची छपाई व वितरण (२०२३-२४)

जीवन शिक्षण विशेषांक (२०२४-२५ )

आमची प्रकाशने

समग्र शिक्षा व PMSHRI अंतर्गत ग्रंथालय पुस्तकांची छाननी व निवड समिती कार्यशाळा (२०२४-२५)

समग्र शिक्षा व PMSHRI अंतर्गत ११२ ग्रंथालय पुस्तकांचा प्रकाशन सोहळा (दि.१२ मार्च २०२५)


राज्यस्तरीय हकेथोन स्पर्धा प्रसंगी प्रसारमाध्यम विभागाचा stall(दि.१२ मार्च २०२५)

सोशल मिडीया

शासन आणि परिषद स्तरावरील महत्वपूर्ण बाबींच्या पोस्ट्स नियमितपणे खालील माध्यमावरती सामाईक केल्या जातात.

FACEBOOK INSTAGRAM

TWITTER You-Tube

उपयुक्त वेबसाईट्स :

उपक्रम/संलग्नता