बदलत्या काळानुसार राष्ट्रीय, सामाजिक व वैयक्तिक गरजा विचारात घेऊन बदललेल्या उद्दिष्टांनुसार शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात बदल करून त्याची वेळोवेळी पुनर्रचना करावी लागते. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ही संस्था कार्यरत असून राज्यस्तरावर (SCERT) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ही संस्था आहे. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक व शैक्षणिक मुल्ये जपणारा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम करणारी ही संस्था आहे. अभ्याक्रमाची पुनर्रचना व नुतनीकरण याची जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये अभ्यासक्रम विकसन विभाग हा सन १९७५-७६ पासून सुरु आहे. दि.२४ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील राज्य स्तरीय संस्थांचे सक्षमीकरण करून पुनर्रचना करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार या संस्थेकडे इ.१ली ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रम निर्मिती व पाठ्यपुस्तक निर्मितीची जबाबदारी देण्यात आली आहे. अभ्यासक्रम विकसन ही जबाबदारी पार पडत आहे.