माहे जानेवारी, १९६४ मध्ये राज्यातील प्रामुख्याने शिक्षणाचा दर्जा / गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य शिक्षणशास्त्र संस्था या नावाने संस्था स्थापन करण्यात आली. त्याचवेळेस राज्य स्तरीय प्रशिक्षणसाठी उपस्थित प्रशिक्षणार्थीच्या निवासाची व्यवस्था संस्थेमध्ये करण्यासाठी वसतीगृह विभागाची स्थपना करण्यात आली.
शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दि.२९.०१.२०१४ नुसार शालेय शिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ही राज्यातील प्रशिक्षणाची शिखर संस्था म्हणून घोषित करण्यात आली असून, प्रशिक्षणाधीना दर्जेदार मुलभुत सोईसुविधा उपलब्ध करुन दद्यावयाच्या आहे. सद्यस्थितीत कार्यालयाच्या आवारातील इमारतीच्या बांधकाम, नुतनीकरण व अंतर्गत सजावटीनंतर होणा-या मूलभूत सोयी-सुविधा अंतर्गत परिषदेमध्ये उपलब्ध असणारी सभागृहे, प्रशिक्षणार्थीची निवासव्यवस्था, कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळ, याची माहिती खालीलप्रमाणे आहे
वरीलप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे प्रशिक्षणार्थीीच्या प्रशिक्षणाची व निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.
परिषदेतील अतिथीभवन वसतीगृह, पुरुष वसतीगृह, सेवापूर्व वसतीगृह व व्ही. आय.पी. वसतीगृह इमारतीचे फोटो सोबत जोडले आहेत