• शासन निर्णय दिनांक १७ ऑक्टोबर २०१६ नुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या संस्थेची पुनर्रचना करण्यात आली आणि या पुनर्रचनेत समन्वय विभागांतर्गत मूल्यमापन विभागाची स्थापना करण्यात आली आहे. • शासन निर्णय दिनांक २४ एप्रिल २०२३ नुसार मूल्यमापन विभागांतर्गत ‘राज्य मूल्यमापन कक्षाची’ (State Assessment Cell) स्थापना करण्यात आली आहे. • शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२४ नुसार मूल्यमापन विभागांतर्गत ‘राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्ष’ (SSSA) ची स्थापन करण्यात आली आहे.