Support Desk : 020-2447 6938
मुदतवाढ! स्पर्धकांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे नवोपक्रम स्पर्धेची मुदत ८ जानेवारी, २०१९ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

नवोपक्रम स्पर्धा (सन २०१८-१९)

Submit your innovative projects for Dec 2018-19 here.

Apply Online

स्पर्धेचे नियम व अटी

Participate in our Innovative Project Competition.

Rules

नवोपक्रम स्पर्धा(सन २०१८-१९)

महाराष्ट्र राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये झपाट्याने शाळा प्रगत होताना दिसू लागल्या आहेत. शाळा-शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी काही नवोपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) मार्फत सन २०१८-१९ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
समग्र शिक्षा नुसार MSCERT च्या कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशी झाली असल्याने या वर्षापासून ही स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.
१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका
२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक
३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती
५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)
ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

संशोधन विभाग महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे